एक्स्प्लोर

Aata Hou De Dhingana Season 5: स्टार प्रवाहवरचा जुना शो, आता नव्या ढंगात; सिद्धार्थ जाधवची एनर्जी अन् 'धिंगाण्याच्या बेटावर' थीम, 'आता होऊ दे धिंगाणा'चं नवं पर्व

Aata Hou De Dhingana Season 5: 'धिंगाण्याच्या बेटावर' ही यंदाच्या पर्वाची भन्नाट संकल्पना प्रेक्षकांना एका रंगीबेरंगी ट्रॉपिकल आयलंडची सफर घडवणार आहे.

Aata Hou De Dhingana Season 5: 'आता होऊ दे धिंगाणा'च्या (Aata Hou De Dhingana) चारही पर्वांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. कलाकारांची धमाल, अनपेक्षित खेळ, टास्कमधला थरार आणि खळखळून हसवणारे क्षण यामुळे हा कार्यक्रम घराघरात पोहोचला. 'आता होऊ दे धिंगाणा'चं पाचवं पर्व (Aata Hou De Dhingana Season 5) पाचपट मनोरंजनाची मेजवानी घेऊन सज्ज झालं आहे. 

'धिंगाण्याच्या बेटावर' ही यंदाच्या पर्वाची भन्नाट संकल्पना प्रेक्षकांना एका रंगीबेरंगी ट्रॉपिकल आयलंडची सफर घडवणार आहे. सोनसळी वाळू, डोलणारी नारळाची झाडं, समुद्रकिनाऱ्याचा मनमोहक नजारा, वॉटर स्पोर्ट्सची मजा आणि भन्नाट बीच गेम्स यामुळे संपूर्ण सेट एका खऱ्याखुऱ्या बेटात रूपांतरित करण्यात येणार आहे. टीमवर्कची खरी कसोटी पाहणारे खेळ आणि उत्साहानं भरलेलं वातावरण यामुळे प्रत्येक भागात प्रेक्षकांना एखाद्या परदेशी बेटावर सुट्टीसाठी आल्याचा अनुभव मिळणार आहे. यंदाच्या पर्वात स्टार प्रवाहच्या प्रेक्षकांना सुद्धा सहभागी होता येणार आहे. 

या सगळ्या धमाल सफरीचा कॅप्टन पुन्हा एकदा असणार आहे महाराष्ट्राचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव. आपल्या भन्नाट शैलीत, उत्स्फूर्त विनोदाने आणि जबरदस्त एनर्जीनं सिद्धार्थ जाधव 'आता होऊ दे धिंगाणा'चं पाचवं पर्व पुन्हा एकदा गाजवण्यासाठी सज्ज आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

'आता होऊ दे धिंगाणा' हा माझ्यासाठी फक्त एक शो नाही, तर... : सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav On Aata Hou De Dhingana Season 5)

'आता होऊ दे धिंगाणा' या नव्या पर्वाविषयी सांगताना सिद्धार्थ जाधव म्हणाला, "आता होऊ दे धिंगाणा' हा माझ्यासाठी फक्त एक शो नाही, तर प्रेक्षकांसोबतचा धमाल प्रवास आहे. या कार्यक्रमानं मला वेगळी ओळख दिली. आजही कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर फिरत असताना 'आता होऊ दे धिंगाणा'चा प्रेक्षकांकडून आवर्जून उल्लेख होतो.  यंदाचं पाचवं पर्व ट्रॉपिकल आयलंडच्या भन्नाट थीममुळे आणखी खास ठरणार आहे. खेळ, मस्ती, साहस आणि कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलाकारांची एनर्जी यामुळे प्रत्येक भाग प्रेक्षकांना खऱ्या आयलंड व्हेकेशनचा अनुभव देईल. यावेळी धिंगाणा अक्षरशः पाचपट होणार आहे. तेव्हा नक्की पाहा, आता होऊ दे धिंगाणा 29 ऑगस्टपासून दर शनिवारी आणि रविवारी रात्री 9 वाजता फक्त स्टार प्रवाहवर..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Shreya Kalra Lock Upp Season 2 Winner: श्रेया कालरा जिंकली 'लॉक अप 2'ची ट्रॉफी; शिवांगी जोशीला 7 मतांनी हरवत जिंकली 1 कोटींचं बक्षीस

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mamachya Govyala Jauya: अंकुश, संतोष, अभिजीत अन् कुशल; चौकडींनी लावला कॉमेडीचा तडका, 'मामाच्या गोव्याला जाऊया'ने किती कमावले?
अंकुश, संतोष, अभिजीत अन् कुशल; चौकडींनी लावला कॉमेडीचा तडका, 'मामाच्या गोव्याला जाऊया'ने किती कमावले?
Aata Hou De Dhingana Season 5: स्टार प्रवाहवरचा जुना शो, आता नव्या ढंगात; सिद्धार्थ जाधवची एनर्जी अन् 'धिंगाण्याच्या बेटावर' थीम, 'आता होऊ दे धिंगाणा'चं नवं पर्व
स्टार प्रवाहवरचा जुना शो, आता नव्या ढंगात; सिद्धार्थ जाधवची एनर्जी अन् 'धिंगाण्याच्या बेटावर' थीम, 'आता होऊ दे धिंगाणा'चं नवं पर्व
Pradeep Rawat Last Rites: बापाला अखेरचा निरोप देताना लेक कोसळला, हमसून हमसून रडला; प्रदीप रावत यांच्या जाण्यानं लेक विक्रमादित्यावर दुःखाचा डोंगर, VIDEO
बापाला अखेरचा निरोप देताना लेक कोसळला, हमसून हमसून रडला; प्रदीप रावत यांच्या जाण्यानं लेक विक्रमादित्यावर दुःखाचा डोंगर, VIDEO
Dimple Kapadia On Nana Patekar: 'मला नाना पाटेकर किळसवाणे, नकोसे वाटतात... '; ज्या अभिनेत्यासोबत सुपरहिट सिनेमे दिले, त्याच नानांबाबत काय म्हणालेल्या डिंपल कपाडिया?
'मला नाना पाटेकर किळसवाणे, नकोसे वाटतात... '; ज्या अभिनेत्यासोबत सुपरहिट सिनेमे दिले, त्याच नानांबाबत काय म्हणालेल्या डिंपल कपाडिया?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Embed widget