एक्स्प्लोर

Pradeep Rawat Last Rites: बापाला अखेरचा निरोप देताना लेक कोसळला, हमसून हमसून रडला; प्रदीप रावत यांच्या जाण्यानं लेक विक्रमादित्यावर दुःखाचा डोंगर, VIDEO

Pradeep Rawat Last Rites: एका लेकासाठी बापाचं जाणं म्हणजे, त्याचा आयुष्यभराचा आधार गमावण्यासारखंच. प्रदीप रावत यांच्या मुलाच्या चेहऱ्यावर वडील गमावण्याचं दुःख स्पष्ट दिसत होतं.

Pradeep Rawat Last Rites: 'सरफरोश' (Sarfarosh), 'लगान' (Lagan) आणि 'गजनी' (Ghajini) यांसारख्या गाजलेल्या हिंदी सिनेमांमधील (Hindi Movie) दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे अभिनेते प्रदीप रावत (Pradeep Rawat) यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना भावपूर्ण निरोप देण्यासाठी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवरांनी अंत्यविधीला हजेरी लावली. यामध्ये आमीर खान (Aamir Khan), राज अर्जुन, रुहानिका धवन आणि राजेंद्र गुप्ता यांचा समावेश होता. अंत्यविधीची प्रक्रिया पार पाडताना त्यांचा मुलगा, विक्रमादित्य रावत, अत्यंत भावूक झालेला दिसून आला. 

एका लेकासाठी बापाचं जाणं म्हणजे, त्याचा आयुष्यभराचा आधार गमावण्यासारखंच. प्रदीप रावत यांच्या मुलाच्या चेहऱ्यावर वडील गमावण्याचं दुःख स्पष्ट दिसत होतं. कितीतरी वेळ धीर धरुन उभ्या असलेल्या विक्रमादित्यच्या भावनांचा बांध अखेर फुटला. ज्यांनी जन्म दिला, ज्यांचं बोट धरुन जग पाहिलं आज त्यांना अखेरचा निरोप देणं विक्रमादित्यसाठी काळीज पिळवटणारं होतं. वडिलांवर अंत्यसंस्कार करताना त्याला रडू आवरणं कठीण झालं आणि तो हमसून हमसून रडताना दिसला. 

मुंबईतील गोरेगाव येथील 'बेस्ट' (BEST) कॉलनीजवळ बुधवारी हा अंत्यविधी पार पडला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आमिर खानपासून ते रझा मुराद यांच्यापर्यंत अनेक कलाकार उपस्थित होते. नव्वदच्या दशकातील दूरदर्शनवरील लोकप्रिय मालिका 'चंद्रकांता'मध्ये 'क्रूर सिंह' (यक्कू) ही भूमिका साकारून प्रसिद्धीस आलेले अखिलेंद्र मिश्रा हेदेखील त्यांना निरोप देण्यासाठी उपस्थित होते. आपल्या वडिलांना निरोप देताना त्यांचा मुलगा भावूक झाला होता आणि तो अत्यंत दुःखी दिसत होता. जड अंतःकरणानं विक्रमादित्य अंत्यविधीची तयारी करताना दिसून आला.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

दोन महिन्यांपूर्वीच पप्पांचं चेकअप केलेलं, त्यात काहीच आलं नाही : विक्रमादित्य रावत

मीडियाशी बोलताना, प्रदिप रावत यांचा मुलगा विक्रमादित्य रावत यानं वडिलांच्या आजारपणाबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, "आम्हाला वाटलं की, हे कदाचित पोटाचं इन्फेक्शन असू शकतं, त्यामुळे त्यावर बरीच औषधे दिली गेली... एक दिवस तब्येत बिघडल्यामुळे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला, रक्त तपासणीत पांढऱ्या रक्तपेशींची (WBC) संख्या खूप जास्त असल्याचं दिसून आलं. त्यांना लगेचच कोकिलाबेन रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. तिथेच आम्हाला समजलं की, त्यांना 'ब्लड कॅन्सर' असण्याची 99% शक्यता आहे, अर्थात आम्हाला तसं नसावं अशी आशा होती, आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना 'ल्यूकेमिया' असल्याचं निदान झालं. मला आणि आईला मोठा धक्का बसला. हा रक्ताच्या कर्करोगाचा अत्यंत दुर्मिळ आणि वेगानं पसरणारा प्रकार असल्याचं आम्हाला समजलं. आम्ही दोन महिन्यांपूर्वीच त्यांची तपासणी केली होती आणि त्यात काहीही आढळलं नव्हतं, त्यानंतर अवघ्या अर्ध्या महिन्यातच कर्करोगाचा प्रादुर्भाव झाला. ही सर्व घटना साधारण दीड महिन्यापूर्वीची आहे..."

कॅन्सर पुन्हा परतला... 

'हिंदुस्तान टाइम्स'च्या वृत्तानुसार, प्रदीप रावत यांचे मॅनेजर सिद्धार्थ तिवारी यांनी सांगितले की, अभिनेत्याला झालेला कर्करोग पुन्हा बळावला होता आणि गेल्या एका महिन्यापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bollywood Actor Pradeep Rawat Struggle Stroy: 'महाभारत'मुळे मिळाली ओळख, 'गजनी'मुळे बनले स्टार; 40 वर्षांची कारकीर्द अन् 100 हून अधिक सिनेमे; प्रदीप रावत यांचा अश्वत्थामापासून सुपरस्टार व्हिलनपर्यंतचा प्रवास

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anirudh Kavya Wedding Card: काय सांगता! अनिरुद्ध - काव्या मारनच्या लग्नपत्रिकेचा फोटो व्हायरल, गोल्डन प्लेटेड वेडिंग कार्डमागचं सत्य काय?
काय सांगता! अनिरुद्ध - काव्या मारनच्या लग्नपत्रिकेचा फोटो व्हायरल, गोल्डन प्लेटेड वेडिंग कार्डमागचं सत्य काय?
Supriya Pathare Negative Role In Tujyakade Tula Maagane: सुप्रीया पाठारेंची राकेश बापटच्या मालिकेत एन्ट्री; पहिल्यांदाच साकारणार 'ही' भूमिका, म्हणाल्या, 'कोल्हापुरी बाज...'
सुप्रीया पाठारेंची राकेश बापटच्या मालिकेत एन्ट्री; पहिल्यांदाच साकारणार 'ही' भूमिका, म्हणाल्या, 'कोल्हापुरी बाज...'
Ramesh Pardeshi father Death: प्रवीण तरडेंच्या अत्यंत जवळच्या मित्राच्या वडिलांचं निधन, 'मुळशी पॅटर्न' फेम रमेश परदेशींवर दु:खाचा डोंगर
प्रवीण तरडेंच्या अत्यंत जवळच्या मित्राच्या वडिलांचं निधन, 'मुळशी पॅटर्न' फेम रमेश परदेशींवर दु:खाचा डोंगर
Smita Jaykar Recalls Meeting Late Actor Sushant Singh Rajput: रिया चक्रवर्तीनं माझ्याकडे सुशांत सिहं राजपूतच्या उपचारांसाठी मदत मागितलेली; मराठमोळ्या अभिनेत्रीचा गौप्यस्फोट, नेमकं काय म्हणाली?
रिया चक्रवर्तीनं माझ्याकडे सुशांत सिहं राजपूतच्या उपचारांसाठी मदत मागितलेली; मराठमोळ्या अभिनेत्रीचा गौप्यस्फोट, नेमकं काय म्हणाली?
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे
Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : स्पाय-पेन आणि गमछा, झोलझालची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Call Recording  : चर्चेत फोन, पहचान कौन? Special Report
Whatsapp Simcard Rules : सिमकार्डशिवाय व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shrikant Shinde and Manoj Jarange patil: मनोज जरांगे पाटलांना 500 कोटी रुपये पोहोचवल्याचा आरोप, ऑडिओ क्लीपमधील दाव्याबाबत श्रीकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
मनोज जरांगेंना 500 कोटी रुपये पोहोचवल्याचा आरोप, ऑडिओ क्लीपमधील दाव्याबाबत श्रीकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
Onkar elephant Sindhudurg: ओंकार हत्ती गावात फिरताफिरता चक्क रिसॉर्टमध्ये पोहोचला, अजस्त्र आकाराचा प्राणी पाहताच कुत्रे घाबरले अन्...
ओंकार हत्ती गावात फिरताफिरता चक्क रिसॉर्टमध्ये पोहोचला, अजस्त्र आकाराचा प्राणी पाहताच कुत्रे घाबरले अन्...
Sushma Andhare : शिंदे-फडणवीस एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्मा रिर्टन्स! नेमकं कोण कोणाचा गेम करतंय? मनोज जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपवरती सुषमा अंधारे थेट बोलल्या
शिंदे-फडणवीस एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्मा रिर्टन्स! नेमकं कोण कोणाचा गेम करतंय? मनोज जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपवरती सुषमा अंधारे थेट बोलल्या
New Zealand vs India, 2nd T20I: टीम इंडियानं मैदानात उतरताच पराक्रम केला अन् सामना जिंकल्यानंतर सद्धा टी-20 मधील भीम पराक्रम नावावर करणार! कट्टर वैरी पाकिस्तानला मागे टाकणार
टीम इंडियानं मैदानात उतरताच पराक्रम केला अन् सामना जिंकल्यानंतर सद्धा टी-20 मधील भीम पराक्रम नावावर करणार! कट्टर वैरी पाकिस्तानला मागे टाकणार
हे खूप मोठं नेटवर्क, माझ्या घरावरती हल्ला करू शकतेत; 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपनंतर जरांगे पाटलांनी व्यक्त केली भीती
हे खूप मोठं नेटवर्क, माझ्या घरावरती हल्ला करू शकतेत; 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपनंतर जरांगे पाटलांनी व्यक्त केली भीती
एकनाथ शिंदेंकडून रामदास कदमांना सूचना, जरांगे पाटलांविषयी बोलू नका, महायुतीतील तणावानंतर हालचाली
एकनाथ शिंदेंकडून रामदास कदमांना सूचना, जरांगे पाटलांविषयी बोलू नका, महायुतीतील तणावानंतर हालचाली
Lalit Prabhakar Photos: तेजाळ मुखडा, सोन्याचा तुकडा... काळजामंदी ठसला; ललित प्रभाकरचा रुबाबदार अंदाज, फोटोंवर खिळल्या नजरा, PHOTOs
तेजाळ मुखडा, सोन्याचा तुकडा... काळजामंदी ठसला; ललित प्रभाकरचा रुबाबदार अंदाज, फोटोंवर खिळल्या नजरा, PHOTOs
New Zealand vs India, 2nd T20I: अखेर बेबी बाॅस वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात वापसी, पण कितव्या नंबरवर खेळणार? संघात दोन बदल
अखेर बेबी बाॅस वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात वापसी, पण कितव्या नंबरवर खेळणार? संघात दोन बदल
Embed widget