एक्स्प्लोर

Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा

Ashok Shinde On Alka Kubal: अशोक शिंदे यांनी मराठी सिनेमा, मालिका आणि नाटक या तिन्ही माध्यमांत मोठे योगदान दिलंय. त्यांनी 100 हून अधिक सिनेमे आणि जवळपास 100 मालिका केल्यात. 

Ashok Shinde On Alka Kubal: मराठी सिनेसृष्टी (Marathi Film Industry), टेलिव्हिजन विश्व (Television News) आणि रंगभूमी (Marathi Theater) गाजवणारं लोकप्रिय नाव म्हणजे, अभिनेते अशोक शिंदे (Actor Ashok Shinde). तब्बल तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी नायक, खलनायक म्हणून रुपेरी पडदा गाजवला. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण केलं. अशोक शिंदे यांनी मराठी सिनेमा (Marathi Film), मालिका (Marathi Serial) आणि नाटक (Theater) या तिन्ही माध्यमांत मोठे योगदान दिलंय. त्यांनी 100 हून अधिक सिनेमे आणि जवळपास 100 मालिका केल्यात. 

मराठी मनोरंजनविश्वात (Marathi Entertainment Industry) ज्येष्ठ अभिनेते अशोक शिंदे (Ashok Shinde) यांनी गेल्या 36 वर्षांत अनेक गाजलेले सिनेमे आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडलीय. आजही ते विविध प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या दीर्घ कारकिर्दीत त्यांना अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळाल्याचं ते सांगतात. अशोक शिंदे यांनी नुकतीच 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्यांनी दिग्गजांसोबत काम करताना त्यांच्या अनेक चांगल्या सवयी आणि कामाची पद्धत शिकायला मिळाली, असं ते सांगतात. मुलाखतीत बोलताना त्यांनी अशोक सराफ आणि अलका कुबल यांच्यासारख्या दिग्गजांकडून आपल्याला दिलेली वेळ पाळणं, हा गुण शिकलो, असं सांगितलं. 

Suvasinichi Hi Satvapariksha - JioSaavn - Listen to New & Old Indian & English Songs. Anywhere, Anytime.

मराठी अभिनेते अशोक शिंदे अभिनेत्री अलका कुबल यांच्याबाबत नेमकं काय म्हणाले? (Ashok Shinde On Alka Kubal)

अशोक शिंदे म्हणाले की, "मी अशोक सराफ यांच्याकडून टायमिंगबाबत शिकलो. सिनेमाच्या सेटवर त्यांनी कधीच कुणाला, "मला लवकर सोडणार नाहीत का?", असं विचारलेलं मी ऐकलं नाही... एखादी वेळ त्यांना दिली की, दुसऱ्या दिवशी ते अगदी त्याच वेळेला सेटवर हजर असायचे. एकदा एका सिनेमाच्या सेटवर त्यांना काहीही काम दिलं नव्हतं, तरीही ते चार दिवस सेटवर असेच बसून होते... एकदा मी न राहून त्यांना विचारलं की, तुम्ही त्यांना सांगितलं नाही का? की तुमच्या शॉर्ट्सचं शूटिंग आधी करून घ्या, तुम्ही असंच बसून आहात... यावर मला म्हणाले की, मी त्यांना आधीच माझ्या या तारखा दिल्या आहेत, मग मी त्यांना कसं काय सांगायचं? मला इथे या तारखांना थांबणं गरजेचंच आहे..."

अलका कुबल सर्वांसमोर पानउतारा करायची... : अशोक शिंदे 

पुढे बोलताना अशोक शिंदे यांनी अलका कुबल यांच्यासोबतचा किस्सा सांगितला. अशोक शिंदे म्हणाले की, "अलका मला सीनियर... माझ्या आधीच तिचे दोन सिनेमे आलेले. ती त्यावेळी मला अगदी फाडूनच खायची... नऊच्या शिफ्टला मी जर 9:10 किंवा 9:15 ला आलो तर संपलं... मग ती सगळ्यांसमोर पानउतारा करायची... मग आम्ही मान खाली घालून राहायचं कारण ती भयंकर चिडलेली असायची... आम्ही दोघांनी साधारण 23 सिनेमे हीरो हीरोइन म्हणून केलेत... कोल्हापूरला तिचं आणि तिच्या नवऱ्याचं प्रोडक्शन हाऊस आहे... त्याच प्रोडक्शन अंतर्गत आम्ही 'सुहासिनीची सत्वपरीक्षा' हा सुपरहिट सिनेमा केलेला. ती मला म्हणायची की, अशोक आज रात्री जागरण वगैरे करू नको, कारण उद्या सकाळी लवकरची शिफ्ट आहे... सातची शिफ्ट असली की, साडेसहाला खाली जमायचं असायचं, पण ती सकाळी साडेपाच वाजताच येऊन बेल मारायची... हे लोक दिग्गज असूनही आपल्या कामात अगदी चोख असायचे..."

दरम्यान, अशोक शिंदे यांच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, अशोक शिंदे यांची 36 वर्षांची अभिनय कारकीर्द अनेक यशस्वी सिनेमे आणि टेलिव्हिजन सीरिअल्सनी समृद्ध आहे. सध्या ते स्टार प्रवाहवरच्या 'सूना येती घरा' मालिकेत मुख्य भूमिकेत दिसून येत आहेत. याशिवाय त्यांच्या 'असंभव', 'छत्रीवाली', 'स्वप्नांच्या पलिकडले', 'स्वाभिमान' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये झळकलेत. तर, 'हिच मुलगी पाहिजे', 'सुहासिनीची सत्वपरीक्षा', 'दव बिंदू', 'काकण', 'मृत्यूपत्र', 'आभास' यांसारखे अनेक गाजलेले सिनेमे त्यांनी केलेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
ना सलमान, ना आमीर; मग भारतातला सर्वात महागडा सुपरस्टार कोण? अमिताभ बच्चन, अक्षय कुमार तर टॉप 5 मध्येही नाहीत
ना सलमान, ना आमीर; मग भारतातला सर्वात महागडा सुपरस्टार कोण? अमिताभ बच्चन, अक्षय कुमार तर टॉप 5 मध्येही नाहीत
Shreya Kalra Lock Upp Season 2 Winner: श्रेया कालरा जिंकली 'लॉक अप 2'ची ट्रॉफी; शिवांगी जोशीला 7 मतांनी हरवत जिंकली 1 कोटींचं बक्षीस
श्रेया कालरा जिंकली 'लॉक अप 2'ची ट्रॉफी; शिवांगी जोशीला 7 मतांनी हरवत जिंकली 1 कोटींचं बक्षीस
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
Mumbai Crime Vikhroli Parksite: मुंबईच्या विक्रोळीत तीन भावांमध्ये घरात गाणी लावण्यावरुन वाद, कुटुंबावर धारदार शस्त्राने वार, दोघांचा मृत्यू
मुंबईच्या विक्रोळीत तीन भावांमध्ये गाणी लावण्यावरुन वाद, कुटुंबावर धारदार शस्त्राने वार, दोघांचा मृत्यू
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
Embed widget