एक्स्प्लोर
Advertisement
Pulwama terror attack : सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यावर विकी कौशल म्हणतो...
'पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याच्या वृत्ताने खूप मोठा धक्का बसला. ही घटना खूपच दुःखद आहे.' असं विकी कौशलने ट्विटरवर म्हटलं आहे.
मुंबई : पुलवामात 39 सीआरपीएफ जवानांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा देशभरातून संताप व्यक्त होत आहे. 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटात मुख्य भूमिका करणारा अभिनेता विकी कौशलने या घटनेविषयी शोक व्यक्त केला आहे.
'पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याच्या वृत्ताने खूप मोठा धक्का बसला. ही घटना खूपच दुःखद आहे. जे सीआरपीएफ जवान शहीद झाले, त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, हीच प्रार्थना' असं विकी कौशलने ट्विटरवर म्हटलं आहे.
जानेवारी महिन्यात प्रदर्शित झालेल्या 'उरी' चित्रपटात भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या घटनेचं चित्रण करण्यात आलं आहे. 'ये नया हिंदुस्थान है, ये घर में घुसेगा भी और मारेगा भी' अशी या चित्रपटाची टॅगलाईन होती. विकीने पॅरामिलीट्रीतील मेजर विहान सिंह शेरगिलची व्यक्तिरेखा साकारली होती. विकी त्याच्या पथकातील जवानांना 'हाऊज द जोश' असं प्रश्न विचारल्यावर 'हाय सर!' असं जोशपूर्ण उत्तर मिळतं. हा संवाद ऐकताना प्रेक्षकांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. दुसरीकडे, या सिनेमात मेजर करण कश्यपची भूमिका साकारणारा अभिनेता मोहित रैनानेही संतप्त सवाल विचारला आहे. 'भारताच्या वीरपुत्रांनो तुमच्या आत्म्याला शांती लाभो.' असं म्हणत राजकीय नेत्यांवर ताशेरे ओढले आहेत.Deeply saddened and shocked to hear the news of the terror attack in #Pulwama . My heart goes out to the families of the brave CRPF soldiers we lost today and praying for the speedy recovery of those injured. 🙏
— Vicky Kaushal (@vickykaushal09) February 14, 2019
दक्षिण काश्मिरच्या अवंतीपुरा भागात गुरुवारी दुपारी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने सीआरपीएफ जवानांच्या बसवर आत्मघाती हल्ला केला होता. हा देशाच्या इतिहास सीआरपीएफ जवानांवर झालेला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जातो. आदिल अहमद दार उर्फ वकास या दहशतवाद्याने हा सुसाईड अटॅक घडवला. आदिल गेल्या वर्षी दहशतवादी संघटनेत भरती झाला होता. आदिलने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेने नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला, अशी माहिती आहे.Rest in Peace,brave sons of India. When will they realise there is no FREEDOM because there is no SLAVERY.Just being played by few self centered,greedy people with malicious intentions.Loss of life is just pure loss of life.Hope someday sense will prevail 🕯🕯🕯#Pulwama #sad
— mohit raina (@mohituraina) February 14, 2019
संबंधित बातम्या :
पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यात मोठा दहशतवादी हल्ला, 39 जवान शहीद
जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही : नरेंद्र मोदी
हल्ल्यावेळी चूक कुठे झाली, शोधून काढायला हवे, सर्जिकल स्ट्राईकचे मास्टरमाइंड निंभोरकरांचे मत
शहीद जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार : माजी लष्करप्रमुखांचा इशारा
Pulwama terror attack : आता रणभूमीवर उत्तर देण्याची वेळ, गौतम गंभीरचा संताप
Pulwama terror attack : हल्ला झालेल्या बसमधील जवानांची नावं
Pulwama terror attack : आदिल अहमद दार, आजच्या हल्ल्याचा क्रूरकर्मा!
भ्याड हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ, राज ठाकरेंचे मोदींना आवाहन
Pulwama terror attack : हल्ल्याला फक्त पाकिस्तान जबाबदार नाही, फारुख अब्दुल्लांचं वादग्रस्त वक्तव्य
Pulwama terror attack : दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर द्या, सरसंघचालक भागवतांची मागणी
Pulwama terror attack : बॉलिवूडकरांनीही व्यक्त केला संताप
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सांगली
Advertisement