Allu Arjun : बॉलिवूडमध्ये धमाका करण्यासाठी अल्लू अर्जुन सज्ज; 'पुष्पा' स्टार झळकणार भूषण कुमारच्या सिनेमात
Sandeep Reddy Vanga : संदीप रेड्डी वांगाच्या आगामी सिनेमात दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
![Allu Arjun : बॉलिवूडमध्ये धमाका करण्यासाठी अल्लू अर्जुन सज्ज; 'पुष्पा' स्टार झळकणार भूषण कुमारच्या सिनेमात Producer Bhushan Kumar director Sandeep Reddy Vanga announce next movie with Indian superstar Allu Arjun Allu Arjun : बॉलिवूडमध्ये धमाका करण्यासाठी अल्लू अर्जुन सज्ज; 'पुष्पा' स्टार झळकणार भूषण कुमारच्या सिनेमात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/03/1b96c332b3b92b8a8f2ac4c6aaf4a7101677819932045254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Allu Arjun Sandeep Reddy Vanga Movie Announcement : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जनचा (Allu Arjun) मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. शाहरुखच्या (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) या सिनेमात अल्लू अर्जुनची झलक दिसणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. दरम्यान त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अल्लू अर्जुनचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. तर भूषण कुमार (Bhushan Kumar) या सिनेमाची निर्मिती करणार आहे.
धमाका करण्यासाठी त्रिकूट सज्ज!
भूषण कुमार आणि संदीप रेड्डी वांगाने नुकतीच आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. टी-सीरिजने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. भूषण कुमार, संदीप रेड्डी वांगा आणि अल्लू अर्जुन हे तिघेही एकाच सिनेमाचा भाग असल्याने या सिनेमाची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. टी-सीरिज फिल्म प्रोडक्शन आणि भद्रकाली पिक्चर्सच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे.
View this post on Instagram
शूटिंगला सुरुवात कधी होणार?
संदीप रेड्डी वांगा सध्या 'स्पिरिट' या सिनेमाचं शूटिंग करत आहे. या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर तो अल्लू अर्जुन सोबतच्या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. संदीप रेड्डी वांगाच्या 'स्पिरिट' या सिनेमाची निर्मितीदेखील टी-सीरिज आणि भद्रकाली पिक्चर्सच्या बॅनरअंतर्गत होत आहे. या सिनेमात प्रभास मुख्य भूमिकेत आहे.
चाहत्यांना प्रतीक्षा 'पुष्पा 2'ची
आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी अल्लू अर्जुन ओळखला जातो. अभिनयासाठी त्याचा डान्सदेखील चाहत्यांच्या पसंतीस उतरतो. दक्षिण भारतात अल्लू अर्जुनची चांगलीच क्रेझ आहे. पण 'पुष्पा' या सिनेमामुळे संपूर्ण भारतात अल्लू अर्जुन लोकप्रिय झाला. त्याच्या या सिनेमाने 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली. अल्लू आणि रश्मिका मंदानाची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यामुळे आता चाहते 'पुष्पा 2'ची (Pushpa 2) आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या
Pushpa 2 : पुष्पा रिटर्न्स... अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक आऊट; 500 कोटींच्या बजेटमध्ये सिनेमाची निर्मिती
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)