एक्स्प्लोर
दीपिकासोबतच्या 'कोल्डवॉर'वरून प्रियंकाची सारवासारव
मुंबई: बॉलीवूडमधील दोन अभिनेत्रींमध्ये मैत्री नसली, तरी पराकोटीचे वाद असतात. अशाच प्रकारचे वाद प्रियंका चोप्रा आणि दीपिका पदुकोण यांच्यात सुरु असल्याचे वृत्त होते. नुकत्याच झालेल्या आयफा पुरस्कारावेळीही दोघांमध्ये मतभेद असल्याचे दिसत होते. पण आता यावरच प्रियंकाने स्पष्टीकरण दिले आहे.
वास्तविक, 2016च्या आयफा पुरस्कारावेळी प्रियंका आणि दीपिका बाजीराव मस्तानी चित्रपटातील 'पिंगा' गाण्यावर परफॉम करणार होत्या. पण हा परफॉमन्स शेवटच्या क्षणी रद्द करण्यात आला. दीपिका प्रियंकासोबत स्टेज शेअर करायला तयार नसल्याचे यावेळी बोलले जात होते. त्यामुळे दीपिकाने 'मल्हारी' आणि प्रियंकाने 'पिंगा' गाण्यावर वेगवेगळे परफॉमन्स सादर केले.
प्रियंकाने यावेळी असा कोणताही वाद नसल्याचे सांगितले होते. बाजीराव मस्तानी चित्रपटातील बेस्ट सपोर्टींग रोलचा तिला जेव्हा पुरस्कार देण्यात आला, त्यावेळी प्रियंकाने रणवीर सोबतच दीपिकाचेही आभार मानले होते. ''थँक्यू बाजीराव मस्तानी, आम्ही चित्रपटात भलेही एकमेकांना नापसंत करीत असू, पण वास्तव जीवनात रणवीर आणि दीपिका हे माझे चांगले मित्र,'' असल्याचे तिने सांगितले होते.
आता प्रियंकाने दोघींच्या संबंधांवरून पुन्हा स्पष्टीकरण दिले आहे. एका मीडिया कार्यक्रमात तिला आयफा पुरस्कारावेळी दोघी एकत्रित परफॉम करणार होता, तर ते का केले नाही? असे विचारले होते. त्यावर ती म्हणाली की,'' हा निर्णय आयफा ऑर्गनाइजिंग कमिटीचा होता. त्याला वेगळा रंग देण्याची काही गरज नाही.''
प्रियंका चोप्रा आणि दीपिका पदुकोण बॉलीवूडमधील सर्वात हिट अभिनेत्री आहेत. प्रियंकाने बॉलीवूडसोबतच हॉलीवूडमध्येही आपली ओळख निर्माण केली आहे. तिच्या 'बेवॉच' या आगामी चित्रपटातील अभिनयाने ती चर्चेत आहे. तर दुसरीकडे दीपिकाही हॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. दीपिका XXX-The Return of Xander Cage या चित्रपटातून हॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे. त्यामुळे प्रियंका कितीही स्पष्टीकरण देत असली तरी या दोघींमध्ये वाद असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement