एक्स्प्लोर

अजित पवारांचा पाय आणखी खोलात? पुण्यातील जमीन खरेदीची चौकशी होणारच, शासन आदेश जारी

शासनाने यासंदर्भात शासन आदेश जारी केला असून पुढील महिनाभरात समितीकडून अहवाल सादर करण्यात येईल.

मुंबई : पुण्यातील मुंढवा (Mundhwa) परिसरातील सर्वे नंबर 88 मधील दस्ताची अवैधरित्या नोंदणी झाली आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर महसूलाची हानी झाली असल्याचे विविध माध्यमांतून वृत्त प्रसारित झाले आहे. प्रस्तुत बातमीच्या अनुषंगाने सदर प्रकरणी सविस्तर चौकशी होणे आवश्यक असल्याने, चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नियुक्त करण्याचा शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार, महसूल, मुद्रांक व नोंदणी विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे (Vikas Kharge) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. शासनाने यासंदर्भात शासन आदेश जारी केला असून पुढील महिनाभरात समितीकडून अहवाल सादर करण्यात येईल.

पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या कंपनीने खरेदी केलेल्या जमीन व्यवहार प्रकरणी सविस्तर चौकशीच्या अनुषंगाने, अपर मुख्य सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे चौकशी समिती नियुक्त करण्यात येत आहे, असे शासन आदेशात म्हटले आहे. तसेच, अध्यक्षांसह 6 जणांचा या समितीत समावेश असणार असून त्यामध्ये विभागीय आयुक्त आणि पुण्याचे जिल्हाधिकारी देखील चौकशी करणार आहेत. दरम्यान, पार्थ पवार यांच्याकडून सदरील जमिनीचा व्यवहार रद्द करण्यात येणार असून ती जमीन शासनाला परत दिली जाईल, अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र, चौकशी समितीकडून संबंधित प्रकरणात ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळाबाजार केला त्यांच्यावर कारवाई होणार आहे. 

चौकशी समितीकडून खालील मुद्द्यांवर होणार चौकशी (Points to be Investigated by the Committee)

  1. प्रस्तुत प्रकरणात अनियमितता झाली आहे का, याबाबत चौकशी करणे.

  2. जर अनियमितता झाली असल्याचे आढळले, तर संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्या विरुद्ध कारवाईची शिफारस करणे.

  3. जर अनियमितता झालेली आढळली, तर सदरील जमीन पूर्वस्थितीवर आणण्यासाठी उपाययोजना सुचविणे.

  4. भविष्यात अशा प्रकारची प्रकरणे पुन्हा उद्भवू नयेत यासाठी उपाययोजना सुचविणे.

समितीमध्ये कोण कोण? (Who Are the Members of the Committee?)

  1. अपर मुख्य सचिव (महसूल, मुद्रांक व नोंदणी)अध्यक्ष

  2. विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे (Divisional Commissioner, Pune Division, Pune)सदस्य

  3. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, पुणे (Settlement Commissioner & Director of Land Records, Pune)सदस्य

  4. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे (Inspector General of Registration & Controller of Stamps, Pune)सदस्य

  5. जिल्हाधिकारी, पुणे (District Collector, Pune)सदस्य

  6. सह सचिव (मुद्रांक), महसूल व वन विभाग, मुंबई (Deputy Secretary, Stamps – Revenue & Forest Department, Mumbai)सदस्य सचिव

हेही वाचा 

धन्या मी तुझ्यासारखा नाही, मी जातवाण आहे; धनंजय मुंडेंच्या पत्रकार परिषदेनंतर जरांगे पाटलांनी ऐकवली ऑडिओ क्लिप

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार
Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Embed widget