(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Priyanka Chopra : माझ्या करिअरच्या सुरुवातीला महिला कलाकारांना दुय्यम वागणूक दिली जायची : प्रियांका चोप्रा
Jee Le Zara : प्रियांका चोप्राचा 'जी ले जरा' या आगामी सिनेमाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे.
Priyanka Chopra On Jee Le Zara : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या मुंबईत आहे. तसेच सध्या ती तिच्या आगामी 'जी ले जरा' (Jee Le Zara) या सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. दरम्यान एका मुलाखतीत प्रियांका म्हणाली,"माझ्या करिअरच्या सुरुवातीला महिला कलाकारांना दुय्यम वागणूक दिली जायची".
प्रियांका म्हणाली,"माझ्या करिअरच्या सुरुवातीला महिला कलाकारांना दुय्यम वागणूक दिली जायची. सिनेमाचं शूटिंग कुठे होणार? सिनेमात कोणते कलाकार असतील यासर्व गोष्टी पुरुष ठरवत असे. पण आता हे चित्र बदलत आहे. महिलांना त्यांचे हक्क मिळायलाच हवेत".
प्रियांकाच्या 'जी ले जरा' या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) मुख्य भूमिकेत आहेत. तर फरहान अख्तर या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. 'जी ले जरा' हा सिनेमा तीन महिलांवर भाष्य करणारा आहे.
'जी ले जरा'च्या शूटिंगला कधी सुरुवात होणार?
'जी ले जरा' या सिनेमाच्या शूटिंगला पुढील वर्षात सुरुवात होणार आहे. प्रियांकानेच यासंदर्भात माहिती दिली आहे. बॉलीवूड लाइफच्या वृत्तानुसार, प्रियांकाने न्यूयॉर्कमध्ये सोना नावाचे एक भारतीय रेस्टॉरंट उघडले आहे. आता भारतातही सोना फ्रँचायझी उघडण्याचा विचार प्रियांका करत आहे.
प्रियांका चोप्राचे आगामी सिनेमे
प्रियांका चोप्राचे आगामी प्रोजेक्ट सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. प्रियांकाचे दोन हॉलिवूड सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. यात 'इट्स ऑल कमिंग बॅक टू मी' आणि 'एंडिंग थिंग्स' या सिनेमांचा समावेश आहे. तसेच 'जी ले जरा' हा बॉलिवूड सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच रुसो ब्रदर्सच्या 'सिटाडेल' या कार्यक्रमाच्या माध्यमातून ती ओटीटीवर पदार्पण करणार आहे.
प्रियांकाची हॉलिवूड एन्ट्री!
'दोस्ताना' चित्रपटातून प्रियंका चोप्राला ‘देसी गर्ल’चा टॅग मिळाला होता. यानंतर प्रियांका चोप्राला हॉलिवूडमधून ऑफर आली. हॉलिवूडमध्ये तिने 'क्वांटिको' आणि 'बेवॉच'सारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले. प्रियांका चोप्रा शेवटचा बॉलिवूड चित्रपट 'द व्हाईट टायगर'मध्ये झळकली होती. त्याचबरोबर ती 'द मॅट्रिक्स रिसरेक्शन' या हॉलिवूड चित्रपटात दिसली होती.
संबंधित बातम्या