Eknath Shinde : 'धर्मवीर'ची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओकने एकनाथ शिंदेंना दिल्या शुभेच्छा; मनोरंजनसृष्टीतून शुभेच्छांचा वर्षाव
Eknath Shinde : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना मनोरंजनसृष्टीतूनदेखील शुभेच्छा दिल्या जात आहेत.
Eknath Shinde : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची नुकतीच शपथ घेतली आहे. आज (30 जूनला) त्यांचा शपथविधी पार पडला. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मनोरंजनसृष्टीतील मंडळीदेखील नव्या सरकारला शुभेच्छा देत आहेत. यात प्रसाद ओक, शरद पोंक्षे, आरोह वेलणकरसह अनेक कलाकारांचा सहभाग आहे. 'धर्मवीर'ची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओकने खास पोस्ट शेअर करत एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमाने आनंद दिघे यांची भूमिका प्रसाद ओकने साकारली होती. आता प्रसादने एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रसादने एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिले आहे, मा. मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब...मन: पूर्वक अभिनंदन आणि कोटी कोटी शुभेच्छा".
View this post on Instagram
दिग्दर्शक विजू माने यांनी यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत एकनाथ शिंदे आणि विजू माने विचारविनिमय करताना दिसत आहे. ठाणे जिल्ह्याचे पहिले मुख्यमंत्री...एकनाथजी शिंदे...लई अभिमान असे म्हणत त्यांनी फोटो शेअर केला आहे.
View this post on Instagram
शरद पोंक्षे दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. महाराष्ट्राचं राजकारण तापलेलं असताना शरद पोंक्षे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले होते. ‘मोठ्या भावासारखे माझ्या पाठीशी खंबीरपणे ऊभे राहीले!’ ही शरद पोंक्षे यांची पोस्ट प्रचंड गाजली. आता मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेबांचं अभिनंदन" असं म्हणत पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेता आरोह वेलणकर नेहमीच राजकीय गोष्टींवर ट्वीट करत त्याचं मत मांडत असतो. आता आरोहने देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तुमच्या नेतृत्वात राज्याची प्रगती होऊदे... गेल्या अडीज वर्षात ज्या गोष्टी घडल्या नाहीत त्या पुढील अडीज वर्षात होऊदेत".
Congratulations to @Dev_Fadnavis and @mieknathshinde with your leadership our state is bound to fly high and cover up the lost ground in the last 2.5 years. All the best. Looking forward. 🇮🇳
— Aroh Welankar (@ArohWelankar) June 30, 2022
संबंधित बातम्या