एक्स्प्लोर
'बाहुबली' प्रभास आणि कतरिना एकत्र
मुंबई : बाहुबली फेम अभिनेता प्रभाससोबत बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ दिसणार असल्याची माहिती आहे. प्रभासचा अपकमिंग सिनेमा 'साहो'चा ट्रेलर 'बाहुबली 2' सोबत रिलीज करण्यात आला होता. 'साहो'मध्ये कतरिनाचीही भूमिका असल्याचं बोललं जात आहे.
कतरिना सध्या तिचा आणि सलमान खानचा अपकमिंग सिनेमा 'टायगर जिंदा है'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शिवाय कतरिना 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मध्ये आमीर खानसोबतही दिसणार आहे. त्यातच ती आता प्रभासच्या 'सोहो'मध्येही दिसणार असल्याची चर्चा आहे.
'साहो' हा प्रभासचा अॅक्शन थ्रिलर सिनेमा आहे. ज्यामध्ये प्रभास रोमँटिक भूमिकेत असणार आहे आणि त्याच्यासोबत कतरिना असेल, अशी माहिती आहे. 2018 मध्ये हा सिनेमा रिलीज होईल.
प्रभासचा 'बाहुबली 2' सध्या बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची उड्डाणे घेत आहे. या सिनेमाने 10 दिवसातच एक हजार कोटींचा गल्ला जमवला होता. अजूनही या सिनेमाची घोडदौड सुरुच आहे.
'साहो'चा ट्रेलर :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement