एक्स्प्लोर

बिग बॉस फेम यूट्यूबरकडून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न; वडिलांचा मोठा निर्णय, थेट वृत्तपत्रात छापलं!

Anurag Dobhal family dispute viral newspaper notice: अनुराग डोभालला त्याच्या वडिलांनी संपत्तीमधून बेदखल केलं आहे.

Anurag Dobhal father disowned him from property: सुप्रसिद्ध यूट्यूबर अनुराग डोभाल हा गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कारणामुळे चर्चेत आहे. सध्या तो रुग्णालयात उपचार घेत आहे.  त्याचा भीषण कार अपघात झाला होता. सोशल मीडियावर लाईव्हवर चाहत्यांसोबत बोलत असताना त्याचा अपघात झाला.  सध्या त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.  त्यानं आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये आत्महत्या करणार असल्याचं सांगितलं होतं.  या दरम्यान, एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.  अनुराग डोभालचे वडील जगदंबा प्रसाद डोभाल यांनी या  प्रकरणासंदर्भात मोठं पाऊल उचललं आहे. त्यांनी आपला मुलगा आणि सुनेला संपत्तीमधून बेदखल केलं आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार,  अनुरागच्या वडिलांनी देहारादूनच्या एका वृत्तपत्राला माहिती छापण्यासाठी दिली. त्यांनी वृत्तपत्रात आपल्या मुलाला संपत्तीमधून बेदखल केलं असल्याचं स्पष्ट केलं आहे.  त्यांनी स्पष्ट शब्दांत, मुलगा अनुराग डोभाल आणि सून रितिका  डोभाल या दोघांचं नाव संपत्तीमधून  काढत असल्याचं सांगितलं.  नोटीसमध्ये त्यांनी हे देखील नमूद केलं की, भविष्यात जर अनुराग आणि त्याच्या पत्नीला गरज भासली,  काही घेवाण देवाण झाली,  तर त्याची जबाबदारी दोघांची असेल, त्यात कुटुंबाचा कोणताही संबंध नसेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. 

अनुराग डोभालच्या वडिलांनी वृत्तपत्राद्वारे जारी केलेली नोटीस, सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  दरम्यान, अनुराग आणि त्याच्या पत्नीला, डोभाल कुटुंबाने आपल्या बेदखल केलं आहे, हे आता वृत्तपत्रातून जगजाहीर झालं आहे.  सध्या वृत्तपत्रावरील ही नोटीस सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

अनुराग डोभालसोबत नेमकं काय घडलं?

काही दिवसांपूर्वी अनुरागने एक व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला होता. या व्हिडिओत त्यानं आपल्या कुटुंबावर गंभीर  आरोप केले होते.   अनुरागचं इंटरकास्ट मॅरेज झालं. त्याच्या लग्नाशी डोभाल कुटुंब नाराज असल्याचं त्यानं स्पष्ट केलं. अनुरागचे कुटुंब त्याच्या लग्नात सहभागी झाले नव्हते, असं त्यानं स्पष्ट केलं.   त्यानं व्हिडिओत, 'माझ्याकडून माझा परिवार, पैसे हिसकावून घेतले जात आहे. मला जर काही झालं तर, त्याला जबाबदार माझे कुटुंब, आई, वडील आणि  भाऊ असेल...', असं त्यानं व्हिडिओतून स्पष्ट केलं.

शनिवारी रात्रीच्या सुमारास अनुराग इन्स्टाग्रामवर लाइव्ह करुन कार चालवत होता. चारचाकी चालवत असताना, त्याच्या वाहनाचा अपघात झाला.  त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget