एक्स्प्लोर

Prabhas & Kriti Sanon: प्रभास-क्रिती एकमेकांना डेट करतायत? ‘आदिपुरुष’च्या जोडीची जोरदार चर्चा...

Prabhas & Kriti Sanon: सध्या क्रिती सेनन आणि प्रभासचे नाव एकत्र जोडले जात आहेत. सोशल मीडियावरही त्यांची जोडी सध्या खूप ट्रेंड करत आहे.

Prabhas & Kriti Sanon: साऊथचा सुपरस्टार प्रभास (Prabhas) त्याच्या प्रोफेशनल लाईफसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. प्रभाससोबत सतत एखाद्या अभिनेत्रीचे नाव जोडले जात असते. मात्र, सध्या चर्चा रंगलीये ती क्रिती (Kriti Sanon) आणि प्रभासच्या जोडीची.. सध्या क्रिती सेनन आणि प्रभासचे नाव एकत्र जोडले जात आहेत. सोशल मीडियावरही त्यांची जोडी सध्या खूप ट्रेंड करत आहे. प्रभास आणि क्रिती सेनन एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे. दोघेही लवकरच ‘आदिपुरुष’ या चित्रपटात मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, ‘आदिपुरुष’चे (Adipurush) शूट संपल्यानंतरही दोघांमधील नाते अजूनही घट्ट आहेत. दोघेही एकमेकांना सतत कॉल किंवा मेसेज करत असतात. दोघेही एकमेकांना पूर्ण वेळ, आदर आणि प्रेम देताना दिसतात. जेव्हा दोन सेलिब्रिटी चित्रपटात एकत्र काम करतात, तेव्हा त्यांच्या लिंक-अपच्या बातम्या नेहमीच समोर येतात. पण क्रिती आणि प्रभास याबाबतीत वेगळे आहेत. दोघेही एकमेकांबद्द्ल खूप सिरिअस आहेत.

‘आदिपुरुष’ची हवा!

क्रिती सेनन (Kriti Sanon) आणि प्रभास (Prabhas) हे दोघेही सध्या ‘सिंगल’ आहेत. दोन्ही स्टार्स आपापल्या कामात व्यस्त आहेत. यामुळेच, त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीबद्दल चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा आहे. त्यांना एकत्र पाहण्यासाठी अनेक चाहते उत्सुक आहेत. त्याचबरोबर हे दोन्ही स्टार्सना देखील एकमेकांची सोबत खूप आवडत आहे.

दिग्दर्शक ओम राऊत ‘आदिपुरुष’चे दिग्दर्शन करणार आहेत, तर टी-सीरीज या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे आणि दोघांचेही चाहते त्यासाठी खूप उत्सुक आहेत. हा चित्रपट 3D मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभाससोबत क्रिती सेनन, सैफ अली खान, सनी सिंह आणि वत्सल सेठ हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात व्हीएफएक्स आणि दमदार अॅक्शन सीक्वेन्स पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

अनेक भाषांमध्ये रिलीज होणार चित्रपट

'आदिपुरुष' हा चित्रपट हिंदीसोबत तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत करणार आहेत. प्रभास व्यतिरिक्त चित्रपटात सैफ अली खान, क्रिती सेनन आणि सनी सिंह दिसणार आहेत. 'आदिपुरुष'ची कथा रामायणावर आधारित असणार आहे. 'तान्हाजी' चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक ओम राऊतने 'आदिपुरुष' या महत्त्वकांशी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच, या चित्रपटात अनेक मराठी कलाकार देखील दिसणार आहेत.

हेही वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Sankarshan Karhade Son: स्टेजवर बाबांची एन्ट्री होताच मुलाचा आंनद गगनात मावेनासा झाला, संकर्षण कऱ्हाडेचा व्हिडीओ पाहून, नेटकरी म्हणाले 'फोटोकॉपीच'
स्टेजवर बाबांची एन्ट्री होताच मुलाचा आंनद गगनात मावेनासा झाला, संकर्षण कऱ्हाडेचा व्हिडीओ पाहून, नेटकरी म्हणाले 'फोटोकॉपीच'
Marathi Actor Hemant Dhome: 'गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही' हेमंत ढोमेंची सणसणीत कविता, नेटकऱ्यांकडून कौतुक
'गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही' हेमंत ढोमेंची सणसणीत कविता, नेटकऱ्यांकडून कौतुक
Vidya Balan Viral Marathi Reel: विद्या बालनचा मराठी गाण्यावर ठसकेबाज अंदाज; दादा कोंडकेंच्या चित्रपटातील गाण्यावर तयार केला रिल, नेटकरी घायाळ
विद्या बालनचा मराठी गाण्यावर ठसकेबाज अंदाज; दादा कोंडकेंच्या चित्रपटातील गाण्यावर तयार केला रिल, नेटकरी घायाळ
Shweta Tiwari on Cockroach Janta Party: प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Siddaramaiah: 'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
Embed widget