Adipurush : अबब! प्रभासच्या ‘आदिपुरुष’वर खर्च झाले ‘इतके’ कोटी, मेकिंग बजेटच्याबाबतीत ‘बाहुबली’लाही टाकले मागे!
Adipurush : प्रसिद्ध अभिनेता प्रभास (Prabhas) त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट 'आदिपुरुष'(Adipurush) प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येण्यासाठी सज्ज झाला आहे.
![Adipurush : अबब! प्रभासच्या ‘आदिपुरुष’वर खर्च झाले ‘इतके’ कोटी, मेकिंग बजेटच्याबाबतीत ‘बाहुबली’लाही टाकले मागे! Prabhas’s Adipurush Making budget reveled Prabhas starrer movie made on whopping budget of Rs 500 crore Adipurush : अबब! प्रभासच्या ‘आदिपुरुष’वर खर्च झाले ‘इतके’ कोटी, मेकिंग बजेटच्याबाबतीत ‘बाहुबली’लाही टाकले मागे!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/28/c40ed3f6a807d8043cad61f1b40d5d93_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Adipurush : मनोरंजन विश्वाचा ‘बाहुबली’ अर्थात प्रसिद्ध अभिनेता प्रभास (Prabhas) त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट 'आदिपुरुष'(Adipurush) प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येण्यासाठी सज्ज झाला आहे. यापूर्वी या प्रभासने बिग बजेट ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’मध्ये काम केले होते, ज्याचे बजेट सुमारे 450 कोटी रुपये होते. मात्र, आता समोर आलेल्या बातम्यांनुसार, प्रभासचा आगामी चित्रपट 'आदिपुरुष' आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट होण्याचा मान मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट तब्बल 500 कोटी रुपयांच्या तगड्या बजेटवर बनवला जात आहे.
प्रभासच्या या चित्रपटाच्या मेकिंगसाठी 500 कोटी रुपये खर्च येणार आहे. इतकंच नाही, तर हे केवळ चित्रपट निर्मितीचे बजेट असल्याचे सांगितले जाते. यामध्ये प्रमोशन बजेटचा समावेश करण्यात आलेला नाही. या मोठ्या बजेटनंतर ‘आदिपुरुष’ हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाच्या बजेटने एसएस राजामौलीच्या ‘बाहुबली 2’ला देखील मागे टाकले आहे. बाहुबली सीरीजच्या दोन्ही चित्रपटांचे बजेट जवळपास 450 कोटी होते. ‘आदिपुरुष’ चित्रपटात त्या काळातील जग निर्माण करण्यासाठी VFX चा वापर केला जात आहे.
पहिल्याच दिवशी चित्रपट हाऊसफुल्ल होईल!
चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, 'आदिपुरुष हा चित्रपट 500 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. हा चित्रपट पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल होणार याची आम्हाला आहे. त्यामुळे आम्ही चित्रपट बनवण्यात कोणतीही कसर सोडणार नाहीय. आम्हाला माहित आहे की, कसलाही विचार न करता हा चित्रपट पाहण्यासाठी येतील. म्हणूनच हा पौराणिक चित्रपट भव्यदिव्य असणार आहे.’
‘हे’ कलाकार साकारणार मुख्य भूमिका
‘आदिपुरुष’ हा पौराणिक शैलीतील चित्रपट आहे. रामायणावर आधारित या चित्रपटात अभिनेता प्रभास भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत असून, अभिनेत्री क्रिती सेनन सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. लक्ष्मणाची भूमिका अभिनेता सनी सिंह करत आहे. ‘आदिपुरुष’ पुढच्या वर्षी 12 जानेवारीला थ्रीडीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘आदिपुरुष’ हा चित्रपट या वर्षी 11 ऑगस्ट रोजी रिलीज होणार होता. परंतु, या चित्रपटाने आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला आणि आपल्या चित्रपटाची रिलीज पुढे ढकलली. यावर आमिरनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘आदिपुरुष’ची टीम, प्रभास आणि निर्मात्यांचे आभार मानले होते.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)