'या' सुपरस्टारची क्रेझ सलमान-शाहरुखच्या स्टारडमवर पडली भारी, 1000 कोटींचे चित्रपट देणारा 'हा' स्टार आहे भारतीयांचा फेवरेट अभिनेता
Most Popular Male Film Star in India : 'या' सुपरस्टारची क्रेझ सलमान-शाहरुखच्या स्टारडमवर भारी पडली आहे. 1000 कोटींचे चित्रपट देणारा प्रभास आता भारतीयांचा आवडता अभिनेता ठरला आहे.
Most Popular Actor in India : भारतात फिल्म इंडस्ट्रीची क्रेझ खूप जास्त आहेत. सेलिब्रिटींची मोठी फॅन फॉलोईंग आहे. फिल्म स्टार्सचा मोठा चाहतावर्ग असून चाहत्यांमधील त्यांची वाढती क्रेझ हेच त्यांच्या यशाचं कारणही आहे. अनेक चाहते आपल्या लाडक्या स्टार्सची एक झलक पाहण्यासाठीही खूप आतूर असतात. त्यांच्या घराबाहेर तासनतास रांगा लावतात. भारतातील फिल्म स्टार्सची फॅन फॉलोइंग इतकी आहे की, दररोज त्यांचे हजारो चाहते त्यांच्या घराबाहेर गर्दी करतात. शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, अमिताभ बच्चन यांची मोठी फॅन फॉलोईंग आहे. पण एका सुपरस्टारची क्रेझ सलमान-शाहरुखच्या स्टारडमवरही भारी पडली आहे. 1000 कोटींचे चित्रपट देणारा हा अभिनेता आता भारतीयांचा आवडता अभिनेता ठरला आहे.
सलमान-शाहरुखच्या स्टारडमवर सुपरस्टार पडला भारी
या सुपरस्टार त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात तेलुगू चित्रपटसृष्टीतून केली. त्याने दमदार अभिनयाच्या जोरावर आता कोट्यवधी भारतीयांच्या मनात स्थान मिळवलं आहे. आता हा अभिनेता पॅन इंडिया स्टार बनला आहे. फक्त देशातच नाहीतर, या सुपरस्टारच्या चाहत्यांची संख्या जगभरात दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. हा सुपरस्टार आता भारतीयांचा सर्वात आवडता अभिनेता बनला आहे. या अभिनेत्याने सलमान खान ते अमिताभ बच्चन यांच्यासारख्या दिग्गज स्टार्सनाही मागे टाकलं आहे. हा सुपरस्टार प्रभास आहे. प्रभास आता भारतीयांचा फेवरेट अभिनेता ठरला आहे.
'हा' आहे भारतीयांचा फेवरेट अभिनेता
शाहरुख-सलमान किंवा आमिरऐवजी हाच सुपरस्टार अभिनेता प्रभास आता निर्मात्यांची पहिली पसंती आहे. यामुळेच निर्माते त्याच्यावर कोट्यवधी गुंतवायलाही मागेपुढे पाहत नाहीत. अनेक चित्रपट निर्माते तर प्रभासला यशाचा फॉर्म्युला मानतात. प्रभासकडे अनेक बिग बजेट चित्रपट आहेत. बॉक्स ऑफिसवर 'बाहुबली', 'बाहुबली 2', 'सालार', 'कल्की 2898 एडी' सारखे हिट सिनेमे देणारा प्रभास. आता फक्त पॅन इंडिया स्टार नसून मोस्ट फेवरेट अभिनेता आहे.
Ormax Stars India Loves: Most popular male film stars in India (Oct 2024) #OrmaxSIL pic.twitter.com/t1qOxTGkKo
— Ormax Media (@OrmaxMedia) November 21, 2024
सर्वात आवडता भारतीय अभिनेता कोण?
प्रभास भारताचा सर्वात आवडता अभिनेता बनला आहे. प्रेक्षकांनी त्याला आवडता भारतीय अभिनेता बनवलं आहे. ओरमॅक्सच्या यादीत अभिनेता प्रभासचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने सलमान ते अमिताभ यांच्यासारख्या बॉलीवूड स्टार्सनाही मागे टाकलं आहे. भारतातील सर्वाधिक आवडत्या अभिनेत्यांच्या यादीत प्रभास अव्वल असून दुसऱ्या क्रमांकावर अभिनेता थलपथी विजय आहे. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर किंग खान शाहरुख खान आणि चौथ्या क्रमांकावर ज्युनियर अँटीआर, तर अजित कुमार पाचव्या क्रमांकावर आहे. या यादीत अल्लू अर्जुन, महेश बाबू, सूर्या, राम चरण आणि सलमान खान यांनीही टॉप 10 मध्ये स्थान मिळवले आहे. या यादीत शाहरुख खान आणि सलमान खान या केवळ दोन बॉलिवूड अभिनेत्यांना स्थान मिळालं आहे. या यादीत साऊथ सिनेसृष्टीतील अभिनेत्यांचा दबदबा आहे.
'या' सुपरस्टारच्या नावे अनेक रेकॉर्ड
अभिनेता प्रभासने बॉक्स ऑफिसवर अनेक हिट चित्रपट दिले आहे. त्याचे बिग बजेट चित्रपटही कोट्यवधींची कमाई करतात. प्रभासच्या नावावर दोन मोठे रेकॉर्ड्स आहेत. त्याच्या दोन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींचा गल्ला जमवला आहे. 1000 कोटींचे तीन चित्रपट देणारा प्रभास दुसरा अभिनेता आहे. त्याच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर 400-500 कोटींहून अधिक कमाई केली आहे. प्रभासच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'कल्की 2899 एडी' चित्रपटाने जगभरात 1042.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. याशिवाय 'बाहुबली 2' ने जगभरात 1788.06 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'बाहुबली' आणि 'सालार' या दोघांनी जगभरात 600 कोटींहून अधिक कमाई केली आहे. आता लवकरच हा अभिनेता आणखी अनेक बिग बजेट चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्याच्याकडे 'सालार 2', 'स्पिरिट', 'हनु राघवपुडी प्रोजेक्ट', 'द राजासाब', 'कल्की 2' असे अनेक चित्रपट आहेत. याशिवाय प्रभासकडे 1000 कोटी बजेटच्या एका चित्रपटाचीही ऑफर आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :