Nayanthara Bikini Look : 'जवान' फेम अभिनेत्री बिकिनी लूकमुळे झालेली ट्रोल, फिगरची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
Nayanthara Bikini Look Controversy : अभिनेत्री नयनतारा एका चित्रपटातील बिकिनी लूकमुळे खूप ट्रोल झाली होती. नेटकऱ्यांनी फिगरबद्दल कमेंट करत तिची खिल्ली उडवली होती.
Nayanthara On Body Shaming : लेडी सुपरस्टार नयनताराच्या आयुष्यावर आधारित 'नयनतारा : बियॉन्ड द फेरीटेल' डॉक्युमेंट्री नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. अभिनेत्री नयनतारा हे साऊथ इंडस्ट्रीसोबत बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. नयनतारा जवान चित्रपटामध्ये अभिनेता शाहरुख खानसोबत झळकली होती. नयनताराचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने मेहनतीच्या बळावर हे यश मिळवलं आहे. अलिकडे नयनतारा तिच्या 'नयनतारा : बियॉन्ड द फेरीटेल' या डॉक्युमेंट्रीमुळे चर्चेत आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये तिने करिअर आणि पर्सनल लाईफमधील अनेक किस्से शेअर केल आहे. नयनताराने यामध्ये ट्रोलिंगवरही भाष्य केलं आहे.
अभिनेत्री नयनतारा बिकिनी लूकमुळे झालेली ट्रोल
लेडी सुपरस्टार म्हणून ओळखली जाणाऱ्या अभिनेत्री नयनतारासाठी तिथंपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. इंडस्ट्रीमध्ये कुणीही गॉडफादर नसताना मेहनतीच्या बळावर तिने फक्त दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीच नाही, तर बॉलिवूडमध्येही नाव कमावलं. नयनतारालाही सुरुवातीच्या दिवसात ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. नयनताराने सांगितलं की, तिला अनेक वेळा ट्रोल केलं गेलं, तिच्या फिगरमुळेही तिला ट्रोल व्हावं लागलं होतं. याबाबत तिने 'नयनतारा : बियॉन्ड द फेरीटेल' (Nayanthara: Beyond the Fairytale) या डॉक्युमेंट्रीमध्ये खुलासा केला आहे.
फिगरची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
नयनताराने तिच्या आयुष्यातील त्या काळाबद्दल सांगितलं, जेव्हा तिला तिच्या फिगरसाठी खूप ट्रोल करण्यात आलं होतं. नयनताराने सांगितलं की, चित्रपटात बिकिनी घातल्यामुळे लोकांनी तिला खूप ट्रोल केलं होतं. नयनताराने खुलासा केली की, अभिनेता सूर्यासोबत 'गजनी' चित्रपटात काम केल्यामुळेही ती ट्रोल झाली होती. तेव्हा अनेकांनी तिच्या अभिनयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तिला विचारलं होतं की, ती अभिनय का करत आहे. ती खूप लठ्ठ आहे, ती चित्रपटातही का आहे? असं म्हणत प्रेक्षकांनी तिच्यावर निशाणा सादला होता.
नयनताराचा बिकिनी लूकवर बनला होता चर्चेचा मुद्दा
अभिनेत्री नयनताराने पुढे सांगितलं की, 2007 मध्ये आलेल्या 'बिल्ला' चित्रपटातील बिकिनी सीनमुळे ती ट्रोल झाली होती. 'बिल्ला' चित्रपटातील एका सीनसाठी नयनताराने बिकिनी घातली होती. नयनतारा बिकिनी लूकमुळे खूप ट्रोल झाली होती. यामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता. हा मुद्दाने खूप जणांनी उचलून धरला होता, असंही तिने सांगितलं.
नयनताराच्या बिकिनी सीनवर नेटकऱ्यांची टीका
"मला काही सिद्ध करण्यासाठी..."
नयनताराने डॉक्यूमेंट्रीमध्ये बिकिनी सीनबाबत खुलासा करत सांगितलं की, "माझ्या बिकिनी सीनमुळे मोठा ड्रामा क्रिएट झाला होता आणि प्रत्येकासाठी तो चर्चेचा मुद्दा बनला होता. पण, मी विचार केला की, अशाच प्रकारे सर्व काही बदलत? हो ना? मी हे कुणासाठी किंवा मला काही सिद्ध करण्यासाठी नाही केलं. मला माझ्या दिग्दर्शकाने सांगितलं की, या चित्रपटासाठी हा सीन महत्त्वाचा आहे आणि मी ते केलं. हा सीन महत्त्वाचा होता आणि मला वाटतं की माझ्यासाठी ते फायदेशीर ठरलं".
महत्त्वाच्या इतर बातम्या :