(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Prabha Atre Passed Away : उद्या मुंबईत कार्यक्रम, आज पुण्याहून निघणार होत्या.. त्याआधीच प्राणज्योत मालवली, प्रभा अत्रे यांच्या निधनाने संगीतसृष्टी हळहळली
Prabha Atre Passed Away : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
Prabha Atre Passed Away : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे (Prabha Atre) यांचे पुण्यातील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. विशेष म्हणजे वयाच्या 92 व्या वर्षी त्या मैफीली रंगवत असून आज एका कार्यक्रमासाठी त्या पुण्याहून मुंबईला येणार होत्या.
प्रभा अत्रे आज 'स्वरप्रभा' या कार्यक्रमात गायन करण्यासाठी पुण्याहून मुंबईला जाणार होत्या. मुंबईत त्यांच्या गायनाचं आयोजन करण्यात आलं होतं. वयाच्या 92 वर्षी देखील त्या गाणं गात होत्या आणि सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहत होत्या.
प्रभा अत्रे यांच्या निधनाने हळहळली संगीतसृष्टी
प्रभा अत्रे या शेवटपर्यंत कार्यरत होत्या. युट्यूबचा एक एपिसोड प्रसारित होणार होता. त्यासाठी त्या मुंबईला जाणार होत्या. वयाच्या 92 व्या वर्षीही त्या अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावत होत्या. गाण्यासंबंधित गोष्टी शेवटपर्यंत प्रभा अत्रे करत राहिल्या. उद्या मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमासाठी आज त्या पुण्याहून निघणार होत्या. पण त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. प्रभा अत्रे यांच्या निधनाने संगीतसृष्टी हळहळली आहे.
प्रभा अत्रे कोण होत्या? (Who is Prabha Atre)
प्रभा अत्रे यांचा जन्म पुण्यात झाला आहे. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी शास्त्रीय गायनाकडे वळल्या. संगीत शिकत असतानाच त्यांनी विज्ञान व कायदा विषयांत पदवी संपादन केली. नंतर त्यांनी संगीतात डॉक्टरेटही केली. प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून प्रभा अत्रे यांचा लौकिक होत्या. गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही त्यांचे प्रभुत्व होते. भारतीय शास्त्रीय संगीत या विषयावर त्यांचा गाढा अभ्यास होता.
ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांनी 11 पुस्तके प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. नवी दिल्लीत त्यांनी हिंदी आणि इंग्रजी भाषेत संगीतावरील 11 पुस्तकांचे प्रकाशन केले. प्रभा अत्रे या अग्रगण्य हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिकांपैकी एक होत्या. प्रभा अत्रे या किराणा घराण्याच्या गायिका होत्या. संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांचा 'पद्मश्री', 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' अशा अनेक पुरस्कारांनी सन्मान केला आहे. प्रभा अत्रे यांनी 11 पुस्तके प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. प्रभा अत्रे या अग्रगण्य हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिकांपैकी एक होत्या.
संबंधित बातम्या