एक्स्प्लोर

Prabha Atre Passed Away : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे पुण्यात निधन; वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Prabha Atre : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे पुण्यात निधन झाले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

Prabha Atre : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे (Prabha Atre) यांचे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने संगीतक्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. प्रभा अत्रे आज 'स्वरप्रभा' या कार्यक्रमात गायन करण्यासाठी पुण्याहून मुंबईला जाणार होत्या. मुंबईत त्यांच्या गायनाचं आयोजन करण्यात आलं होत. वयाच्या 92 वर्षी देखील त्या गाणं गात होत्या आणि सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहत होत्या. 

प्रभा अत्रे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पहाटे झोपेत असताना प्रभा अत्रे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या आधीच त्यांचं निधन झाल होतं.  प्रभा अत्रे यांचे नातेवाईक अमेरिकेत असल्याने ते भारतात आल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  पद्मश्री,  पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं होतं. प्रभा अत्रे या किराणा घराण्याच्या गायिका होत्या. संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांचा 'पद्मश्री', 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' अशा अनेक पुरस्कारांनी सन्मान केला आहे. 

प्रभा अत्रे कोण होत्या? (Who is Prabha Atre)

प्रभा अत्रे यांचा जन्म पुण्यात झाला आहे. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी शास्त्रीय गायनाकडे वळल्या. संगीत शिकत असतानाच त्यांनी विज्ञान व कायदा विषयांत पदवी संपादन केली. नंतर त्यांनी संगीतात डॉक्टरेटही केली. प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून प्रभा अत्रे यांचा लौकिक होत्या. गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही त्यांचे प्रभुत्व होते. भारतीय शास्त्रीय संगीत या विषयावर त्यांचा गाढा अभ्यास होता.

ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांनी 11 पुस्तके प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. नवी दिल्लीत त्यांनी हिंदी आणि इंग्रजी भाषेत संगीतावरील 11 पुस्तकांचे प्रकाशन केले. प्रभा अत्रे या अग्रगण्य हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिकांपैकी एक होत्या. प्रभा अत्रे यांची भाची अमेरिकेतून आल्यानंतर मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

प्रकृतीला न जुमानता आयुष्यभर मैफिली करणाऱ्या प्रभा अत्रे

प्रभा अत्रे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत लोकसत्ताचे सहाय्यक संपादक मुकुंद संगोराम म्हणाले,"राशिद खान यांच्या निधनानंतर प्रभा अत्रे यांच्या निधनाची बातमी आली आहे. प्रभा ताईंचा आज मुंबईत कार्यक्रम होता. त्यांचं निधन ही भारतीय संगीतविश्वासाठी क्लेशदायक घटना आहे. गेली 70 वर्ष त्या गात आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत आपली प्रतिभा त्यांनी टवटवीत ठेवली. ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. संगीत ही फक्त सादर करण्याची गोष्ट नसून त्याचा विचार, अभ्यास करायला हवा असा विचार करत त्यांनी यात शिक्षणदेखील घेतलं होतं. प्रकृतीला न जुमानता त्यांनी आयुष्यभर मैफिली केल्या. गाणं हाच त्यांचा श्वास होता, ध्यास होता". 

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका आरती अंकलिकर म्हणाल्या,"प्रभा ताईंचं निधन होईल असं कधीच वाटलं नव्हतं. त्या चिरतरुण होत्या. त्या गाणं गाताना कधी 92 वर्षांच्या आहेत, असं कधी वाटलंच नाही. गेल्या 50 वर्षांपासून मी प्रभा ताईंना ओळखत आहे. कायमच त्या हसतमुख होत्या. संगीतविश्वात त्यांनी मोठं काम केलं होतं. आजच्या काळात त्यांची खूप गरज होती". 

पंडित अमरेंद्र धनेश्वर प्रभा ताईंबद्दल बोलताना म्हणाले,"गायन, अध्यापन, लेखन अशा सर्व क्षेत्रांमध्ये अत्यंत ठाशीव कामगिरी करणाऱ्या डॉ. प्रभा अत्रे होत्या. 14 जानेवारी 2024 रोजी मुंबईत त्यांचा सत्कार होणार होता. त्यानंतर त्यांचं गायन होणार होतं. ते गायन ऐकण्यासाठी त्यांचे मुंबईतील रसिक आतुर झाले होते. सर्व प्रकारांतील संगीताला त्यांनी योग्य न्याय दिला आहे". 

संबंधित बातम्या

Prabha Atre :  एका अपघाताने मी संगीत क्षेत्राकडे वळले; डॉ. प्रभा अत्रे यांनी उलगडला त्यांचा सांगीतिक प्रवास

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 13 May 2024 : आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sushma Andhare on Raj Thackeray : राज ठाकरे सुपाऱ्या वाजवतात, सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोलABP Majha Headlines : 11 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech Thane Sabha : फोडाफोडी, शरद पवार ते उद्धव ठाकरे, सभेत राज ठाकरे बरसलेTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 11 PM: 12 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 13 May 2024 : आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
Embed widget