Poojappura Ravi Passed Away : मल्याळम अभिनेते पूजापुरा रवी यांचे निधन; 800 पेक्षा अधिक सिनेमांत केलंय काम
Poojappura Ravi : अभिनेते पूजापुरा रवी यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.
Poojappura Ravi Passed Away : मल्याळम सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते पूजापुरा रवी (Poojappura Ravi) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सिनेसृष्टीतूनही शोक व्यक्त केला जात आहे.
पूजापुरा रवी यांनी 800 पेक्षा अधिक सिनेमांत केलंय काम
पूजापुरा रवी यांनी 800 पेक्षा अधिक सिनेमांत काम केलं आहे. 'गप्पी' या सिनेमात ते शेवटचे झळकले आहेत. या सिनेमात त्यांनी मल्याळम अभिनेते टोविनो थॉमस यांच्यासोबत काम केलं होतं. दिवंगत एन.के. आचार्य यांच्या नाटकाच्या माध्यमातून पूजापुरा रवी यांनी त्यांच्या करियरची सुरुवात केली. मल्याळम रंगभूमीवरील ते लोकप्रिय अभिनेते होते. आजवर त्यांनी अनेक लोकप्रिय सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
पूजापुरा रवी यांचा सिनेप्रवास जाणून घ्या... (Poojappura Ravi Movies)
पूजापुरा रवी यांनी 4,000 पेक्षा अधिक नाटकांत आणि 800 पेक्षा अधित सिनेमांत काम केलं आहे. कल्पन कपैल थन्ने, राउडी रामू, ओर्माकल मरिक्कुमो, मुथरमकुन्नु पीओ, पूचक्कोरू मुक्कुथी, माझा पय्युन्नु मद्दलम कोट्टुन्नु आणि कदथनदान अंबाडी हे त्यांचे सिनेमे सुपरहिट ठरले होते. अनेक मालिकांमध्येही त्यांनी काम केलं आहे.
View this post on Instagram
पूजापुरा रवी यांच्या निधनाबद्दल सिनेविश्वातील मंडळींसह राजकीय क्षेत्रातील मंडळींनीदेखील शोक व्यक्त केला आहे. पूजापुरा रवी यांचा दक्षिणेत मोठा चाहतावर्ग आहे.
त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टी पोरकी झाली आहे. केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्हीडी सतीसन, सांस्कृतिक मंत्री साजी चेरियन, उच्च शिक्षण मंत्री डॉ. आर बिंदू आणि माजी मंत्री केके सेलजा आणि जी सुधाकरन यांनीही रवी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
पूजापुरा रवी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कधी होणार?
पूजापुरा रवी यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. 'एढू निरंगल' हा रवी यांचा पहिला सिनेमा आहे. 90 च्या दशकामध्ये त्यांना खूपच लोकप्रियता मिळाली. त्यानंतर अभिनेत्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. पूजापुरा रवी यांनी सिनेमात अनेक विनोदी भूमिका साकारल्या आहेत. मालिकांमधील त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या आहेत.
संबंधित बातम्या