Payal Rohatgi Arrested: अभिनेत्री पायल रोहतगीला अटक, पोलीस ठाण्यात तिच्यासोबत गैरवर्तणूक केल्याचा पती संग्रामचा आरोप
Payal Rohatgi Arrested By Ahmedabad Police: पायल रोहतगी हिला अहमदाबाद पोलिसांनी अटक केली आहे. सोसायटीतील सदस्यांवर खोट्या केस करुन अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप पायलवर आहे.
![Payal Rohatgi Arrested: अभिनेत्री पायल रोहतगीला अटक, पोलीस ठाण्यात तिच्यासोबत गैरवर्तणूक केल्याचा पती संग्रामचा आरोप Payal Rohatgi Arrested By Ahmedabad Police in Threatening Society Chairperson Actress Payal Rohtagi is arrested by Ahmedabad Polic Payal Rohatgi Arrested: अभिनेत्री पायल रोहतगीला अटक, पोलीस ठाण्यात तिच्यासोबत गैरवर्तणूक केल्याचा पती संग्रामचा आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/25/de460973b550b83093e0e08514cfaf91_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अहमदाबाद : अभिनेत्री पायल रोहतगी हिला अहमदाबाद पोलिसांनी अटक केली आहे. पायलवर सोसायटीच्या अध्यक्षांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. पायल आणि सोसायटीतील सदस्यांमध्ये बराच काळापासून वादा सुरु होता. पायलच्या वडिलांनी 4-5 वर्षांपूर्वी या सोसायटीत घर विकत घेतलं होतं. सोसायटीही देखील नवीनचं आहे.
पायलवर काय आरोप आहे?
सोसायटीची सदस्य नसतानाही पायल 20 जून रोजी सोसायटीच्या सर्वसाधारण वार्षिक सभेत आली होती. मात्र, तिला बैठकीत बोलून दिलं नाही. त्यामुळे संतापलेल्या पायलने सभेत शिवीगाळ करत सदस्यांसोबत वाद घातला. सोसायटीच्या तक्रारीनुसार पायलने यापूर्वीही बर्याचवेळा वाद घातला आहे. अध्यक्षांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही तिच्यावर ठेवण्यात आला आहे. ही संपूर्ण बाब अहमदाबादच्या सुंदरबन एपिटॉम सोसायटीची आहे.
संग्राम सिंह यांनी संपूर्ण प्रकरण सांगितले
यावर पायलचा पती संग्राम सिंह यांनी एबीपी न्यूजशी विशेष चर्चा करताना सांगितले की, पायल घरात किंवा इमारतीच्या आवारात कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ बनवण्यास या सोसायटीचा आक्षेप होता. यावरुन सोसायटीतील सदस्य तिला वारंवार रोखत होते. संग्रामच्या म्हणण्यानुसार सोसायटी पायलच्या कुटुंबीयांकडून विकास शुल्क म्हणून 5 लाख रुपयांची मागणी करत होते. हाच सोसायटी आणि पायल यांच्यातील वादाचा मुद्दा होता. संग्राम यांनी सांगितले की पोलिसांनी पायलला आज सकाळी 9 वाजता कोणतेही समन न देता पकडून नेले आणि पोलिस स्टेशनमध्ये तिच्यासोबत चुकीचं वर्तन करत मारहाण केली.
यापूर्वीही पायलला अटक
पायल रोहतगी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे आणि अनेक विषयांवर ती आपले मत देत राहते. यामुळे बर्याचवेळा तिला वादाचा सामना करावा लागतो. 2019 मध्ये, नेहरू-गांधी घराण्याबद्दलच्या पोस्टवरून तिला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी कोर्टाने तिला कोठडीत पाठवलं होतं. त्यावेळी तिला एका दिवसात जामीन मिळाला होता.
View this post on Instagram
पायल रोहतगी कायम चर्चेत असते
पायल नेहमीच तिचे व्हिडिओ आणि पोस्टबद्दल चर्चेत असते. काही काळापूर्वी जेव्हा कंगना रनौतचे ट्विटर अकाउंट निलंबित झाले होते, तेव्हा तिचा रडतानाचा व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओमध्ये पायल बंगालमधील हिंसाचाराचा उल्लेख करत रडत होती. यात ती म्हणत होती, "कंगनाचे ट्विटर अकाउंट का काढून टाकले. तिने असे काहीही चुकीचे लिहिले नसेल. आम्ही सरकारमध्ये नाही पण मोदी जी, तुम्ही पंतप्रधान आहात ना? तुम्ही त्यांना का वाचवत नाही?"
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)