![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
OTT Release This Week : 'जादूगर' ते 'जनहित में जारी'; 'या' आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार रोमान्स अन् अॅक्शनचा तडका
OTT : लवकरच अनेक वेबसीरिज आणि सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत.
![OTT Release This Week : 'जादूगर' ते 'जनहित में जारी'; 'या' आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार रोमान्स अन् अॅक्शनचा तडका OTT releases this week Jaadugar to Janhit Mein Jaari The dawn of this movie and Web series releases ott on this week OTT Release This Week : 'जादूगर' ते 'जनहित में जारी'; 'या' आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार रोमान्स अन् अॅक्शनचा तडका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/11/2b0e567dfb5fced85727f913cb492d131657553773_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
OTT Release This Week : कोरोनाकाळानंतर प्रेक्षक ओटीटी (OTT) माध्यमाकडे वळू लागले आहेत. ओटीटीवर प्रत्येक आठवड्यात अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होत असतात. या आठवड्यातदेखील प्रेक्षकांना रोमान्स, अॅक्शन, थ्रिलर आणि अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. या आठवड्यात प्रेक्षकांना 'जादूगर', 'जनहित में जारीसह' अनेक सिनेमे पाहायला मिळणार आहेत.
कुंगफू पांडा - द ड्रॅगन नाईट
कधी होणार प्रदर्शित? 14 जुलै
कुठे होणार प्रदर्शित? नेटफ्लिक्स
'कुंगफू पांडा - द ड्रॅगन नाईट' या वेबसीरिजचा पहिला सीझन14 जुलैपासून प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे. या वेबसीरिजमध्ये अॅनिमेशन मार्शल आर्ट्स आहे.
जादूगर
कधी होणार प्रदर्शित? 15 जुलै
कुठे होणार प्रदर्शित? नेटफ्लिक्स
पंचायत फेम जितेंद्र कुमारचा 'जादूगर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 15 जुलैपासून नेटफ्लिक्सवर प्रेक्षक हा सिनेमा पाहू शकतात. या सिनेमात जितेंद्र मीनू नावाचे पात्र साकारत आहे.
जनहित में जारी
कधी होणार प्रदर्शित? 15 जुलै
कुठे होणार प्रदर्शित? झी 5
सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'जनहित में जारी' आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 15 जुलैपासून हा सिनेमा प्रेक्षक झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. अनेक सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. या सिनेमात नुसरत भरुचा मुख्य भूमिकेत आहे.
शूरवीर
कधी होणार प्रदर्शित? 15 जुलै
कुठे होणार प्रदर्शित? डिज्नी प्लस हॉटस्टार
'शूरवीर' ही वेबसीरिज 15 जुलैपासून प्रेक्षकांना डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे. या वेबसीरिजमध्ये प्रेक्षकांना थरार नाट्य आणि अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या
Web Series New Seasons : 'द फॅमिली मॅन 3' ते 'मिर्झापूर 3'; बहुचर्चित सीरिजचे पुढचे सीझन लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Thor Love And Thunder : 'थोर लव्ह अॅन्ड थंडर' प्रेक्षकांच्या पसंतीस; भारतात केली रेकॉर्डब्रेक कमाई
Akdi Pakdi Song : 'लायगर' सिनेमातील बहुचर्चित 'अकडी पकडी' गाणं रिलीज; विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेचा रोमॅंटिक अंदाज
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)