OTT Release This Week : 'द केरळ स्टोरी' ते 'Zwigato'; 'या' आठवड्यात ओटीटीवर पाहायला मिळणार सस्पेन्स अन् थ्रिलरने गाजलेले चित्रपट
OTT Release This Week : जानेवारी 2024 च्या दुसऱ्या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे सिनेमे रिलीज होणार आहेत.
OTT Release This Week : मनोरंजनसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे सिनेमे (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) प्रदर्शित होत आहे. जानेवारी 2024 च्या दुसऱ्या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे सिनेमे रिलीज होणार आहेत. सिनेमागृहात धमाका केलेले सिनेमेदेखील ओटीटीवर रिलीज होणार आहे. 'द केरळ स्टोरी'पासून (The Kerala Story) ते 'ज्विगेटो'पर्यंत (Zwigato) अनेक सिनेमांचा यात समावेश आहे.
द केरळ स्टोरी (The Kerala Story)
कुठे पाहता येईल? झी 5
'द केरळ स्टोरी' या सिनेमाचे ओटीटी राईट्स झी 5 या प्लॅटफॉर्मने विकत घेतले आहेत. या सिनेमात अदा शर्मा मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाचं कथानक तीन मुलींवर आधारित आहे. अदा शर्मासह योगिता बिहानी, सोनिया बलानी आणि सिद्धी डडनानी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
एजेंट (Agent)
कुठे पाहता येईल? सोनी लिव्ह
'एजेंट' हा सिनेमा 2023 मध्ये सुपरफ्लॉप ठरला होता. सिनेमागृहात निराशाजनक कामगिरी केलेला हा सिनेमा आता ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज आहे.
टायगर 3 (Tiger 3)
कुठे पाहता येईल? प्राईम व्हिडीओ
सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा 'टायगर 3' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला. पण आता हा सिनेमा प्रेक्षक प्राईम व्हिडीओवर पाहू शकतात. या सिनेमात शाहरुख खानचीदेखील एक झलक दिसणार आहे.
ज्विगेटो (Zwigato)
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स
'ज्विगेटो' या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. नेटफ्लिक्सवर हा सिनेमा आता रिलीज होणार आहे. नंदिता दासने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. एका फूड डिलीव्हरी करणाऱ्या मुलाची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे.
सालार (Salaar)
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स
दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या 'सालार' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता हा सिनेमा प्रेक्षक नेटफ्लिक्सवर पाहू शकतात. 12 जानेवारी 2024 रोजी या सिनेमाचं ओटीटीवर स्ट्रीमिंग होणार आहे.
'डंकी' ओटीटी रिलीज (Dunki OTT Release)
शाहरुख खानचा 'डंकी' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून रिलीजच्या दोन महिन्यानंतर हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्यात येणार आहे. जिओ सिनेमावर हा सिनेमा रिलीज होऊ शकतो. 155 कोटींमध्ये जिओ सिनेमाने या सिनेमाचे ओटीटी राईट्स विकत घेतले असल्याचं म्हटलं जात आहे. राजकुमार हिरानी यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
संंबंधित बातम्या