Devara Teaser Out : ज्युनियर एनटीआरच्या 'देवरा'चा टीझर आऊट; अभिनेत्याच्या दबंग अंदाजाने जिंकले चाहत्यांचे मन
JR NTR : अभिनेता ज्युनियर एनटीआरच्या 'देवरा' (Devara) या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. टीझरमधील अभिनेत्याच्या दबंग अंदाजाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Devara : दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर (JR NTR) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी 'देवरा' (Devara) या सिनेमामुळे चर्चेत आहे. घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या बहुप्रतीक्षित सिनेमाचा टीझर आऊट झाला आहेय टीझरमधील अभिनेत्याच्या दबंग अंदाजाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
ज्युनियर एनटीआरच्या 'देवरा' या सिनेमाची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. या सिनेमात सुपरस्टार अॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळणार आहे. दिवसेंदिवस प्रेक्षकांमध्ये या सिनेमाची उत्सुकता वाढत चालली आहे.
'देवरा'चा टीझर आऊट! (Devara Teaser Out)
'देवरा' या सिनेमाचा टीझर आता आऊट झाला आहे. या व्हिडीओमध्ये ज्युनियर एनटीआरच्या पात्राची झलक पाहायला मिळत आहे. टीझरमध्ये ज्युनियर एनटीआर म्हणत आहे,"या समुद्राने माश्यांपेक्षा खून आणि खंजीर अधिक पाहिलं आहे. त्यामुळेच याला 'लाल समुद्र' असं म्हटलं जातं".
View this post on Instagram
'देवरा'च्या टीझरमध्ये ज्युनियर एनटीआर अॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळणार आहे. टीझर रिलीज झाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. प्रेक्षक आता या सिनेमाच्या ट्रेलरची प्रतीक्षा करत आहेत. 'देवरा' हा पॅन इंडिया सिनेमा आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शन मोड पाहायला मिळणार आहे. या सिनेमात ज्युनियर एनटीआरसोबत जान्हवी कपूर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तसेच श्रीकांत मेका, टॉम शाइन चाको हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार देवरा (Devara Teaser Out)
'देवरा' हा बहुचर्चित सिनेमा 5 एप्रिल 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेलुगू, तामिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. नंदामुरी कल्याण रामने या सिनेमाची निर्मिती केली आहे. सैफ अली खानदेखील (Saif Ali Khan) या सिनेमात झळकणार आहे.
युवासुधा आर्ट्स आणि एनटीआर आर्ट्सच्या बॅनरअंतर्गत 'देवरा' या सिनेमाची निर्मिती होत आहे. अनिरुद्ध रविचंदरने या सिनेमाला संगीत दिलं आहे. देवरा हा बिग बजेट सिनेमा आहे. या सिनेमाच्या वीएफएक्सवर 140 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ज्युनियर एनटीआरच्या या बहुचर्चित सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या