(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ott Release This Week: प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; या आठवड्यात रिलीज होणार जबरदस्त चित्रपट आणि वेब सीरिज
Ott Release This Week: या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार्या चित्रपटांबद्दल आणि वेब सीरिजबद्दल जाणून घेऊयात...
Ott Release This Week: वीकेंडला ओटीटीवरील (OTT) चित्रपट (Films) आणि वेब सीरिज (Web Series) पाहण्याची आवड अनेकांना असते. ओटीटीवर या आठवड्यात अनेक चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होणार आहे. यापैकी बरेच चित्रपट आणि वेब सीरिज हे सस्पेन्स-थ्रिलरने भरलेले आहेत. जे तुमचे मनोरंजन करतील. या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार्या चित्रपटांबद्दल आणि वेब सीरिजबद्दल जाणून घेऊयात...
‘दुरंगा: सीझन 2’ (Duranga: Season 2)
‘दुरंगा: सीझन 2’ ही वेब सीरिज 24 ऑक्टोबर रोजी ZEE5 वर रिलीज केली जाणार आहे. अमित साध, दृष्टी धामी आणि गुलशन देवय्या या कलाकारांनी ‘दुरंगा: सीझन 2’ या वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.
View this post on Instagram
एस्पिरेंट्स-2 (Aspirants: Season 2)
एस्पिरेंट्स वेब सीरिजचा दुसरा सीझन हा 25 ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या वेब सीरिजची कथा UPAC एस्पिरेंट्सवर आधारित आहे. 2021 मध्ये एस्पिरेंट्स वेब सीरिजचा पहिल्या सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.
'चंद्रमुखी 2' (Chandramukhi 2)
'चंद्रमुखी 2' हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे. हा चित्रपट 26 ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.पी. वासू यांनी "चंद्रमुखी 2" या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कंगना रनौत आणि राघव लॉरेन्स यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.
View this post on Instagram
कॉफी विथ करण सीझन 8 (Koffee With Karan Season 8)
'कॉफी विथ करण 8' हा कार्यक्रम 26 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक हा कार्यक्रम डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. या कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडमध्ये दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमाचे सात सीझन्स प्रेक्षकांच्या भेटीस आले.
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या:
Marathi movie On Ott: वीकेंडला ओटीटीवर घरबसल्या पाहा हे मराठी चित्रपट