(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MM Keeravani COVID Positive: नाटू नाटू गाण्याचे संगीतकार M. M. Keeravani यांना कोरोनाची लागण; डॉक्टरांकडून बेड रेस्टचा सल्ला
एमएम किरवाणी (MM Keeravani) यांना कोरोनाची लागण झाली.एका मुलाखतीमध्ये एमएम किरवाणी यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांच्या हेल्थची अपडेट चाहत्यांना दिली.
MM Keeravani COVID Positive: प्रसिद्ध संगीतकार एमएम किरवाणी (MM Keeravani) यांना कोरोनाची लागण झाली आहे. एमएम किरवाणी यांना बेड रेस्ट घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. एका मुलाखतीमध्ये एमएम किरवाणी यांनी मुलाखतीमध्ये त्यांच्या हेल्थची अपडेट चाहत्यांना दिली. ही मुलखत किरवाणी यांनी ऑनलाईन दिली.
एका मुलाखतीमध्ये एमएम किरवाणी यांनी सांगितलं, 'मला आता कोरोनाची लागण झाली आहे. प्रवास आणि उत्साहाचा हा परिणाम आहे. मी औषधोपचार घेत आहे. मला डॉक्टरांनी बेड रेस्टचा सल्ला दिला आहे.'
एमएम किरवाणी यांनी काही दिवसांपूर्वी ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्यात त्यांच्या नाटू नाटू या गाण्यानं बेस्ट ऑरिजनल साँग या कॅटेगिरीमधील पुरस्कार पटकावला. नाटू नाटू हे गाणं 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या आरआरआर या चित्रपटामधील आहे. एम.एम किरवाणी यांनी ऑस्करच्या स्टेजवर गाण्याच्या स्वरुपात भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, "आरआरआर चित्रपटाचा भारतीयांना अभिमान वाटावा, अशी माझी इच्छा होती. राजामौली आणि माझ्या कुटुंबाची देखील तिच इच्छा होती. आता ऑस्कर जिंकल्यानंतर मला टॉप ऑफ द वर्ल्ड असल्यासारखे वाटत आहे.'
.@mmkeeravaani & @boselyricist 🙌🏻
— RRR Movie (@RRRMovie) March 13, 2023
From Ekkadoo Putti Ekkadoo Perigi to the Oscar Stage ❤️❤️❤️
The journey can never get bigger than this!! #NaatuNaatu #RRRMovie pic.twitter.com/ngFExB1MX2
गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्याला देखील एमएम किरवाणी यांनी हजेरी लावली होती. गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यामधील बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील पुरस्कार नाटू नाटू या गाण्यानं पटकावला.
एमएम किरवाणी यांनी तेलुगू, तमिळ कन्नड, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांमधील गाण्यांचे संगीत दिग्दर्शन केलं. क्षना क्षनम (1991), घराना मोगुडू (1992), अल्लारी प्रियुडू (1993), क्रिमिनल (1994), सुभा संकल्पम (1995), पेल्ली सनदी (1996), देवरागम (1996) यांसारख्या चित्रपटांमधील गाण्यांचे त्यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे.
आरआरआर चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती
आरआरआर हा पॅन इंडिया चित्रपट आहे. तेलुगूसोबतच हिंदी, इंग्रजी अशा अनेक भाषांमध्ये हा चित्रपट जगभरात रिलीज झाला. आरआरआर या चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासोबतच आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटामधील गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
इतर महत्वाच्या बातम्या: