(Source: Poll of Polls)
Oscar Awards 2023 : 'टॉप गन मॅव्हरिक' ते 'ब्लॅक पॅंथर 2'; 'ऑस्कर 2023' नामांकन विजेते सिनेमे घरबसल्या पाहा...
Oscar 2023 : 'ऑस्कर 2023'साठी नामांकन मिळालेले सिनेमे प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील पाहू शकतात.
Oscar Awards 2023 : ऑस्कर (Oscar) हा सिनेविश्वातील मानाचा पुरस्कार आहे. 95 व्या अकादमी पुरस्कार म्हणजेच 'ऑस्कर पुरस्कार 2023'कडे (Oscar Awards 2023) जगभरातील सिनेप्रेमींचं लक्ष लागलं आहे. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा 12 मार्च 2023 रोजी पार पडणार आहे. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात जगभरातील विविध दर्जाच्या सिनेमांना नामांकन जाहीर झालं आहे. त्यामुळे पुरस्कार सोहळ्यात अटीतटीचा सामना रंगणार आहे.
टॉप गन मॅवरिक, द बंशीज ऑफ इनिशेरिन, ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, एल्विस अशा अनेक सिनेमांना 'ऑस्कर 2023'साठी नामांकन जाहीर झालं आहे. त्यामुळे यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात कोण बाजी मारणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. ऑस्कर नामांकन जाहीर झालेले सिनेमे अनेकांनी पाहिले नसतील. तर हे सिनेमे आता सिनेप्रेमींना ओटीटी प्लॅटफॉर्मवर घरबसल्या पाहता येणार आहेत.
टॉप गन मेव्हरिक (Top Gun Maverick)
'टॉप गन मॅव्हरिक' या सिनेमाला 'ऑस्कर 2023'मध्ये सहा नामांकन मिळाले आहेत. हा सिनेमा प्रेक्षक प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात.
द बंशीज ऑफ इनिशेरिन (The Banshees Of Inisherin)
'द बंशीज ऑफ इनिशेरिन' या सिनेमाला यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात वेगवेगळ्या श्रेणीमध्ये नऊ नामांकन मिळाले आहेत. हा सिनेमा प्रेक्षक डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला आहे.
ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रन्ट (All Quiet On The Western Front)
'ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रन्ट' या सिनेमाला 'ऑस्कर 2023'मध्ये नऊ नामांकन मिळाले आहेत. हा सिनेमा प्रेक्षक नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात.
एल्विस (Elvis)
'ऑस्कर 2023'मध्ये 'एल्विस' या सिनेमाला आठ नामांकन मिळाले आहेत. हा सिनेमा प्रेक्षक प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक पाहू शकतात.
ब्लॅक पॅंथर - वकांडा फॉरेव्हर (Black Panther Wakanda Forever)
मार्वल स्टुडिओजच्या 'ब्लॅक पॅंथर - वकांडा फॉरेव्हर' या सिनेमाला ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात चार नामांकन मिळाले असून हा सिनेमा प्रेक्षक डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज करण्यात आला आहे.
टर्निंग रेड (Turning Red)
सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन या कॅटेगरीत 'टर्निंग रेड' या सिनेमाला नामांकन मिळालं आहे. हा सिनेमा प्रेक्षक डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात.
अर्जेंटिना 1985 (Argentina 1985)
'सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म' या कॅटेगरीमध्ये 'अर्जेंटिना 1985' या सिनेमाला नामांकन मिळालं आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना प्राइम व्हिडीओवर पाहता येईल.
संबंधित बातम्या