Orry: "ती अतिशयोक्ती होती" ; ओरीनं फोटो काढण्यासाठी मिळणाऱ्या पैशाबाबत केलेल्या वक्तव्यावर दिलं स्पष्टीकरण
Orry:ओरीनं बिग बॉसमध्ये वक्तव्य केलं होतं. याबद्दल वक्तव्याबद्दल ओरीनं सांगितलं. आता या वक्तव्यावर ओरीनं स्पष्टीकरण दिलं आहे.
![Orry: Orry Says say About Earning Rs 20 30 Lakhs For Pictures With Celebs Was A Lie Orry:](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/28/e15855488df4b47d3f76679769ae71cd1701145664140646_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Orry: सोशल मीडियावर सध्या चर्चेत असणारा ओरहान अवत्रामणी (Orhan Awatramani) उर्फ ओरीने काही दिवसांपूर्वी बिग बॉस 17 (Bigg Boss 17) मध्ये सहभाग घेतला होता. ओरी हा एका दिवसासाठी बिग बॉसमध्ये गेला होता. शोमध्ये जाण्यापूर्वी ओरीनं सलमान खानसोबत (Salman Khan) मजेशीर विषयांवर गप्पा मारल्या. यावेळी ओरीने सलमाननं विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देखील दिली. "लोक मला त्यांच्या पार्ट्यांमध्ये आमंत्रित करतात आणि मला त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि मुलांसोबत पोज देण्यास सांगतात. मी त्यांच्यासोबत पोज देतो आणि सोशल मीडियावर फोटो पोस्ट करतो. यासाठी मी 20 ते 30 लाख रुपये घेतो", असं ओरीनं बिग बॉसमध्ये वक्तव्य केलं होतं. याबद्दल वक्तव्याबद्दल ओरीनं सांगितलं. आता या वक्तव्यावर ओरीनं स्पष्टीकरण दिलं आहे.
काय म्हणाला ओरी?
ओरीने आयएएनएसला सांगितले की, "मी सेल्फीबद्दल केलेले विधान मला आवडले, ती अतिशयोक्ती होते आणि मला त्याबद्दल लिहिलेलं आर्टिकल आवडले"
पुढे ओरी म्हणाला, “माझी इच्छा आहे की मी प्रति सेल्फी इतके पैसे कमावावेत पण, मी जर इतरे पैसे कमावले असते तर तुम्ही मला एका बेटावर एका यॉटमध्ये जीवन जगताना पाहाल."
View this post on Instagram
कोण आहे ओरी?
ओरी हा विविध बॉलिवूड पार्ट्यांमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. या फोटोमध्ये ओरी आणि बॉलिवूडमधील कलाकार दिसतात.
ओरी नेमकं काय काम करतो? त्याची लाईफस्टाईल कशी आहे? या सर्व गोष्टींबाबत जाणून घेण्यास नेटकरी उत्सुक असतात. ओरी हा विविध बॉलिवूड पार्ट्यांमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. या फोटोमध्ये बॉलिवूडमधील कलाकार दिसतात. ओरीच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात.
बिग बॉसच्या मंचावर ओरीनं सांगितलं होतं की, माझे 5 मॅनेजर आहेत. हे मॅनेजर विविध कामे करतात. जसे की, एक फूड मॅनेजर आहे, मी काय खातो? याकडे लक्ष देतो." तो म्हणाला होता, "मी पार्टीला जाण्यासाठी पैसे घेत नाही, तर पार्टीतील लोकांसोबत पोज देऊन फोटो काढून ते फोटो सोशल मीडियावर फोटो पोस्ट करण्यासाठी पैसे घेतो."
इतर महत्वाच्या बातम्या:
Orry:"भाई तू नक्की काय काम करतो?"; अभिनेत्रीला कायम चिकटून असणाऱ्या 'ओरी' नं अखेर सांगूनच टाकलं
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)