Nushrratt Bharuccha : "तेव्हा आजूबाजूला बॉम्बस्फोटांचे आवाज..."; इस्त्रायलमधून भारतात सुखरूप परतल्यानंतर नुसरत भरुचानं शेअर केला व्हिडीओ
Nushrratt Bharuccha: नुसरतनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिनं भारत सरकारचे आभार मानले आहेत.
Nushrratt Bharuccha: अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान नुरसात इस्रायलमध्ये अडकली होती. 8 ऑक्टोबर रोजी ती भारतात सुखरूप परतली. नुसरत ही विमानतळावर स्पॉट झाली. आता नुसरतनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला, नुसरतने इस्रायलमध्ये अडकलेल्या असताना तिच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्यांचे तसेच तिला मेजेस करणाऱ्यांचे आणि तिच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या लोकांचे आभार मानले आहेत.
काय म्हणाली नुसरत?
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नुसरत म्हणते, "मी परत आले आहे. मी सुरक्षित आहे. मी ठीक आहे. पण दोन दिवसांपूर्वी मी हॉटेलच्या खोलीत होते आणि मला जाग आली तेव्हा आजूबाजूला बॉम्बस्फोटांचे आवाज येत होते. त्यानंतर आम्हाला तळघरात नेण्यात आले. मला याआधी असा अनुभव कधीच आला नव्हता. पण आज जेव्हा मी माझ्या घरात आले तेव्हा मला शांतता जाणवली. आपण या देशात राहतो म्हणून आपण खूप भाग्यवान आहोत. आपण सुरक्षित आहोत."
View this post on Instagram
नुसरतने या व्हिडीओच्या माध्यमातून भारतात सुरक्षित परतल्यानंतर भारत सरकार, भारतीय आणि इस्रायली दूतावासांचे आभार मानले आहेत. तसेच लवकरच शांतता प्रस्थापित होईल, अशी आशाही व्यक्त केली.
नुसरतनं शेअर केली पोस्ट
नुसरतनं एक पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून नुसरतने इस्रायलमध्ये आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, "गेला आठवडा माझ्या स्मरणात कायमचा राहिल.. भावनांचा रोलरकोस्टर राईड, त्यातील शेवटचे 36 तास माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय आणि भयावह आहेत."
View this post on Instagram
'हैफा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव'साठी ही नुसरत ही इस्रायलला गेली होती. या चित्रपट महोत्सवासाठी त्यांच्या अकेली या चित्रपटाची निवड करण्यात आली होती. दरम्यान, तेथे युद्ध सुरू झाले आणि नुसरत तेथेच अडकली. त्यानंतर तेथून त्याला सुखरूप भारतात परत आणण्यात आले.
संबंधित बातम्या: