एक्स्प्लोर

Nushrratt Bharuccha : इस्त्रायलमध्ये अडकलेली नुसरत भरुचा सुखरूप भारतात परतली; म्हणाली,"मला थोडा वेळ..."

Nushrratt Bharuccha : इस्त्रायलमध्ये अडकलेली नुसरत भरुचा सुखरूप मायदेशी परतली आहे.

Nushrratt Bharuccha : इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये (Israel-Palestine Escalation) युद्ध सुरू आहे.  या युद्धामुळे बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) इस्त्रायलमध्ये अडकली होती. त्यामुळे तिचे चाहते चिंता व्यक्त करत होते. पण आता अभिनेत्री सुखरूप भारतात परतली आहे. मुंबई विमानतळावर ती स्पॉट झाली आहे. 

नुसरत भरुचा सुखरूप मायदेशी भारतात (Nushrratt Bharuccha back to India Israel Hamas) परतली आहे. मुंबई विमानतळावरील अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या फोटो-व्हिडीओमध्ये अभिनेत्री घाबरलेली दिसत आहे. एआयने शेअर केलेल्या नुसरतच्या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत तिचा बॉडीगार्डदेखील दिसत आहे. 

मला थोडा वेळ द्या : नुसरत भरुचा

मुंबई विमानतळावर मीडियासोबत बोलताना नुसरत म्हणाली,"आता माझ्या देशात आले आहे. मला आधी घरी जायचं आहे. कृपया मला माझ्या गाडीपर्यंत जाऊद्या. मला थोडा वेळ द्या". नुसरत मायदेशी सुखरूप परतल्याने तिच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

नुसरत भरुचा इस्त्रायलमधील युद्धात अडकली होती. त्यानंतर तिच्यासोबत काहीही संपर्क होत नसल्याचं समोर आलं. काही वेळाने अभिनेत्रीसोबत संपर्क साधण्यात तिच्या टीमला यश आलं. आता नुसरत मायदेशी परतली असून सुखरूप आहे. हायफा आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी नुसरत इस्त्रायलला गेली होती. 

नुसरत भरुचाचा सिनेप्रवास... (Nushrratt Bharuccha Movies)

नुसरत भरुचा बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. अनेक सिनेमांच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. 'प्यार का पंचनामा', 'ड्रीम गर्ल', 'जनहित में जारी', 'राम सेतू' सारख्या सिनेमांचा नुसरत भाग आहे.

नुसरतने 2006 मध्ये 'जय संतोषी माँ' या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. काही दिवसांपूर्वी तिचा 'अकेली' (Akeli) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात युद्धात अडकलेल्या एका मुलीचा घरी परतण्यासाठीचा संघर्ष दाखवण्यात आला होता. आता सिनेमाप्रमाणे अभिनेत्रीला वैयक्तिक आयुष्यातही या गोष्टीचा सामना करावा लागला आहे.

संबंधित बातम्या

Nushrratt Bharuccha : इस्त्रायल युद्धात अडकलेली नुसरत भरुचा सुखरूप; लवकरच मायदेशी परतणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारीEknath Shinde Koregaon Sabha : महेश शिंदेंच्या प्रचारसाठी कोरेगावात सभा, शिंदेंची कोरेगावात सभाSharad Pawar On Retirement : 14 वेळा निवडणुका लढल्या, आता निवडणुक लढणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनातील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनातील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Embed widget