एक्स्प्लोर

Nitin Desai Suicide: टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी नितीन देसाई यांनी कर्मचाऱ्याला कोणता निरोप दिला?

नितीन देसाई (Nitin Desai Suicide) यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जे जे रुग्णालयात केले जाणार आहे.

Nitin Desai Suicide:  कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai Suicide) यांनी आत्महत्या केली आहे. त्यांचा मृतदेहाचे शवविच्छेदन जे जे रुग्णालयात केले जाणार आहे. थोड्याच वेळात मृतदेह कर्जत ND स्टुडिओ इथून जे जे हॉस्पिटलकडे नेण्यात येणार आहे.

मयूर ठोंबरे यांनी एबीपी माझाला सांगितले की, 'नितीन देसाई दादा यांनी एक चिठ्ठी लिहिली होती. त्यामध्ये त्यांनी लिहिलं की, 6 नंबरचे ग्राउंडच्या इथे  त्यांचा अंत्यविधी करण्यात यावा. अंत्यविधी तिथेच करण्यात येईल,आतमध्ये तयारी सुरू आहे.'

पुढे त्यांनी सांगितले की, 'एका कर्मचाऱ्याला त्यांनी निरोप दिला होता की, तू सकाळी  8.30 वाजता माझ्या ऑफिसमध्ये ये. तिथे एक व्हॉईस रेकॉर्डर असेल तो चेक कर. मी आणि तो कर्मचारी दोघे तिथे गेलो, तेव्हा आम्ही त्यांना लटकलेले बघितले.' 

'मराठी पाऊल पडते पुढेच्या सेटवर त्यांनी आत्महत्या केली, तिथे खाली एक मोठा धनुष्यबाण काढण्यात आला होता, दादांनी एका रस्सीच्या मदतीने तो काढला, आणि त्याच्या बाणाचे टोक स्वतःकडे ठेवले. जिथे ते टोक होते तिथेच त्यांनी आत्महत्या केली होती.आम्ही तिथे गेलो हे बघितलं आणि सिक्युरिटी आणि पोलिसांना सांगितले मग पोलीस आले.' अंसंही मयूर ठोंबरे यांनी सांगितलं.

अनेक कलाकारांनी  तसेच राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे. जितेंद्र जोशी,अमोल कोल्हे,अभिजीत पानसे यांनी शोक व्यक्त केला. तसेच विनोद तावडे ,सुप्रिया सुळे,नितीन देसाई, चित्रा वाघ या  राजकीय नेत्यांनी नितीन देसाई यांना वाहिली श्रद्धांजली आहे.

2005 मध्ये नितीन देसाई यांनी एन.डी.स्टुडिओची स्थापना केली. नितीन देसाई यांनी अनेक सुपरहिट हिंदी सिनेमांचे सेट उभारले होते.'1942 अ लव्ह स्टोरी', 'हम दिल दे चुके सनम', 'माचिस', 'देवदास', 'लगान', 'जोधा अकबर' या सुपरहिट सिनेमाचं त्यांनी कला दिग्दर्शन केलं होतं. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते महाराष्ट्रातील सर्व राजकारण्यांपर्यंत नितीन देसाई यांचे चांगले संबंध होते. नितीन देसाई हे इंडस्ट्रीतलं मोठं नाव आहे. 80 च्या दशकात नितीन देसाई यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. '1942 अ लव्ह स्टोरी' या सिनेमाने नितीन देसाई यांना खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला होता. पुढे अनेक लोकप्रिय दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Nitin Desai Suicide: अक्षय कुमार ते संजय दत्त; नितीन देसाई यांना बॉलिवूड कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

 

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
Embed widget