एक्स्प्लोर

Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत

Akola Abhay Patil and Shinde Camp: गेल्या काही दिवसांपासून अकोल्याच्या राजकारणात सुरु असलेल्या घडामोडींना वेग आला आहे. शनिवारी रात्री अकोल्यातील राजकारणात एक महत्त्वाची घडामोड घडली.

Akola Abhay Patil and Shinde Camp: अकोल्यात काँग्रेसकडून लोकसभा लढवलेले डॉ. अभय पाटील यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास असलेल्या ॲड. निलेश देशमुखांनी भेट घेतली.  डॉ. अभय पाटील (Abhay Patil) यांच्या टॉवर चौकातील निवासस्थानी रात्री ही भेट पार पडली. वर्षभरापूर्वी पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन काँग्रेस सोडणारे डॉ. अभय पाटील मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे. अलीकडेच डॉ. पाटील यांनी एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) भेट घेतली होती. पुढच्या दोन दिवसात डॉ. अभय पाटील आपल्या समर्थकांची बैठक घेऊन आपला राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते. त्याच पार्श्वभूमीवर या बैठकीआधी ॲड. निलेश देशमुख यांनी डॉ. पाटील यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या दोघांमध्ये बंद दाराआड तब्बल दोन तास चर्चा झाली. उभय नेत्यांनी एकत्र जेवणही केले. त्यामुळे सध्या अकोल्याच्या राजकारणात या 'डिनर डिप्लोमॅसी'ची जोरदार चर्चा रंगली आहे. (Maharashtra politics news)

अकोल्यात शिंदेंच्या शिवसेनेकडून मोठा राजकीय मासा गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 2024 मध्ये काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार असलेल्या डॉ. अभय पाटील यांनी नुकतीच मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. दोघांच्या तासभराच्या भेटीत पुढच्या राजकीय निर्णयाबद्दल उहापोह झाल्याची चर्चा होती. त्यानंतर आता डॉ. पाटील यांच्या भेटीसाठी निलेश देशमुख यांनी थेट अकोल्यात धाव घेतल्याने डॉ. अभय पाटील लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. अभय पाटील हे तब्बल 4 लाख 16 हजार मते घेत दुसऱ्या स्थानावर राहिले होते. तर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे तिसऱ्या क्रमांकावर होते. दरम्यान, काँग्रेसच्या कार्यपद्धतीला कंटाळून वर्षभरापूर्वी डॉ. पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षामध्ये प्रवेश केलेला नव्हता. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर काँग्रेसच्या नेत्यांनी अकोल्यात नुकतीच त्यांची भेट घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. डॉ. अभय पाटलांनी पुढच्या दोन दिवसांत आपल्या समर्थकांची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर डॉ. अभय पाटील पुढचा राजकीय निर्णय घेणार आहेत.

Who is Abhay Patil: कोण आहेत डॉ. अभय पाटील?

1) विदर्भातील नामवंत अस्थिरोगतज्ञ.
2) वडील डॉ. के. एस. पाटील विदर्भातील नामवंत अस्थिरोगतज्ञ होते. डॉ. के. एस. पाटील विश्व हिंदू परिषदेचे मोठे नेते.
3)  आधीच्या कार्यकारिणीत डॉ. अभय पाटील प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस होते
4) डॉ. पाटील अकोला होते 2024 च्या लोकसभेत काँग्रेसचे उमेदवार
5) मराठा मोर्चाच्या समन्वयकांपैकी एक.

Akola Lok Sabha Election: 2024 च्या लोकसभेत अकोल्यात उमेदवारांना मिळालेली मते 

अनुप धोत्रे  : भाजप : 457030
डॉ. अभय पाटील : काँग्रेस : 416404
प्रकाश आंबेडकर : वंचित : 276747

भाजपचे अनुप धोत्रे 40 हजार 626 मतांनी विजयी.

आणखी वाचा

भाजपचे धोत्रे आणि प्रकाश आंबेडकरांशी दोन हात करण्याासाठी काँग्रेसने अकोल्यात निष्णात 'सर्जन' रिंगणात उतरवला, कोण आहेत डॉ. अभय पाटील?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाण्यात शिवसेनेला धक्का! नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचं पद रिक्त, निवडणूक प्रक्रियेकडे सर्वांचं लक्ष 
ठाण्यात शिवसेनेला धक्का! नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचं पद रिक्त, निवडणूक प्रक्रियेकडे सर्वांचं लक्ष 
जरांगे पाटील हे माझे भाऊ, मी त्यांना घरी जेवायला यायचे निमंत्रण देते, अमृता फडणवीसांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा
जरांगे पाटील हे माझे भाऊ, मी त्यांना घरी जेवायला यायचे निमंत्रण देते, अमृता फडणवीसांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा
सुनिल तटकरे संधीचा दुरुपयोग करत लोकांना हिणवतात, महेंद्र दळवींचा निशाणा, म्हणाले, अनिकेत तटकरेंना सगळं फुकटचं मिळालं
सुनिल तटकरे संधीचा दुरुपयोग करत लोकांना हिणवतात, महेंद्र दळवींचा निशाणा, म्हणाले, अनिकेत तटकरेंना सगळं फुकटचं मिळालं
Highcourt: पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
Advertisement

व्हिडीओ

DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC : परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
Highcourt: पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
Pune Case : पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
Embed widget