Narendra Modi Oath Ceremony : 'हा ऐतिहासिक क्षण', पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार रजनीकांत; 'या' बॉलीवूड कलाकारांनीही दिल्या शुभेच्छा
Narendra Modi Oath Ceremony : काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार असून त्यासाठी बॉलीवूड कलाकारांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Narendra Modi Oath Ceremony : काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे तिसऱ्यादां देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. आज संध्याकाळी 7.15 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना आणि इतर केंद्रीय मंत्र्यांना पदाची शपथ देतील. दरम्यान, या शपथविधी सोहळ्यात कलाविश्वातीलही अनेक मंडळी सहभागी होणार आहेत. यामध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतपासून (Rajinikanth) ते ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते अनुपम खेरपर्यंतच्या (Anupam Kher) नावांचा समावेश आहे.
शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार
सुपरस्टार रजनीकांत यांनी एएनआय शी बोलताना पंतप्रधानपदाची शपथ घेणार असलेल्या नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी म्हटलं की, 'मी शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार आहे. हा अतिशय ऐतिहासिक कार्यक्रम आहे. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल मी मोदीजींचे अभिनंदन करतो.
#WATCH | Delhi: Actor Rajinikanth says, "I am going to take part in the swearing-in ceremony... It is a very historic event. I congratulate PM Modi Ji for becoming the prime minister for the consecutive third time..." pic.twitter.com/zdcrdZ2kSm
— ANI (@ANI) June 9, 2024
हा एक ऐतिहासिक क्षण - अनुपम खेर
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनीही मोदी सरकार 3.0 च्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी म्हटलं की, 'मी भाग्यवान आहे की मला 15 वर्षांत तीनदा शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. हा ऐतिहासिक क्षण आहे. देश सुवर्णकाळातून जात आहे. गेल्या 10 वर्षात पंतप्रधानांनी अतिशय ताकदीने देश चालवला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे, मला पूर्ण विश्वास आहे की ते देशालाही पुढे घेऊन जातील.
#WATCH | Delhi | On the third term of the Modi government, Actor Anupam Kher says, "It is my good fortune that I am taking part in the oath ceremony for the third time. It is a historical moment. In the last 10 years, the prime minister has run the country very well. I hope the… pic.twitter.com/ld2qOrinjG
— ANI (@ANI) June 9, 2024
अजय देवगन, अनिल कपूरनेही दिल्या शुभेच्छा
अनिल कपूरने प्रतिक्रिया देताना म्हटलं की, मला फक्त इतकच वाटतं की, देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत राहो. तसेच अजय देवगननेही एक पोस्ट शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने म्हटलं की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुन्हा निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. त्यांच्या ज्ञानाने आणि करुणेने भारताला प्रगतीच्या आणि महानतेच्या मार्गावर नेण्यात त्यांना यश मिळावे अशी माझी इच्छा आहे.'