एक्स्प्लोर
पहिला चित्रपट सुपरहिट, नंतर नाही चालली जादू; इंडस्ट्रीपासून दूर असूनही कोट्यवधींची मालकीण आहे 'ही' अभिनेत्री
Shamita Shetty Story : अभिनेत्री शमिता शेट्टीचा बॉलिवूड डेब्यू सुपरहिट ठरला, पण त्यानंतर तिला खास प्रसिद्धी मिळवता आली नाही. तिच्याबद्दल जाणून घ्या.
Shamita Shetty Story
1/11

अभिनेत्री शमिता शेट्टीचा पहिला चित्रपट सुपरहिट ठरला, पण त्यानंतर तिची जादू मोठ्या पडद्यावर चालली नाही. मात्र, इंडस्ट्रीपासून दूर असूनही ती कोट्यवधींची मालकीण आहे, तिच्या संपत्तीबद्दल जाणून घ्या.
2/11

Shamita Shetty Life Story : अभिनेत्री शिल्पा शेट्टीची छोटी बहिण शमिता शेट्टीचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला, या चित्रपटाने 90 कोटी रुपये कमावले. यावेळी शमिताच्या खूप कौतुकही झालं होतं.
3/11

अभिनेत्री शमिता शेट्टी 90 च्या दशकातील तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली होती. तिचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला आणि ती प्रसिद्धीझोतात आली. सौंदर्य आणि अभिनयाने तिने लाखोंनी घायाळ केलं.
4/11

अभिनेत्री शमिता शेट्टी शाहरुख खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण, त्यानंतर तिचं करियर काही खास चाललं नाही.
5/11

शाहरुख खानच्या चित्रपटातून 2000 साली शमिता शेट्टीने डेब्यू केला. या चित्रपटाने बंपर कमाई केली, पण त्यानंतर तिच्या हाती अपयश आलं.
6/11

'मोहब्बतें' या 2000 साली आलेल्या चित्रपटातून शमिता शेट्टीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. शमिता शेट्टीचीही खूप चर्चा झाली.
7/11

मोहब्बते चित्रपटानंतर शमिता शेट्टीने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. याशिवाय, तिने 'मेरे यार की शादी है' चित्रपटामध्ये आयटम साँग केलं, जे खूप गाजलं.
8/11

त्यानंतर शमिता शेट्टीने फरेब, जेहर, कॅश आणि द टीनंट या चित्रपटांमध्ये काम केलं, पण यामधून तिला फारसं यश मिळालं नाही.
9/11

त्यानंतर 2008 पासून शमिता बॉलिवूडपासून दूर गेली. दरम्यान, शमिता शेट्टीने बिग बॉस शोद्वारे कमबॅकचा प्रयत्न केला, मात्र तोही फ्लॉप ठरला.
10/11

शमिता शेट्टी सध्या फिल्म इंडस्ट्रीपासून दूर असली तरी, ऐशोरामात आयुष्य जगत आहे. 5 मिलियन नेटवर्थ असलेली शमिता शेट्टी खूपच लक्झरियस आयुष्य जगत आहे.
11/11

बॉलिवूडपासून दूर गेल्यावर तिने व्यवसायावर लक्ष केंद्रीत केलं. सध्या ती एक यशस्वी इंटिरियर डिझायनर आहे. व्यवसाय आणि जाहिरांतीमधून कमाई करणारी शमिता सध्या 46 वर्षांची असून कोट्यवधींची मालकीण आहे.
Published at : 03 Feb 2025 08:03 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
वर्धा

















