MIFF : मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात; असं करा तिकीट बुक
MIFF : मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. 29 मे ते 5 जून दरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे.
MIFF : 17 व्या 'मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'ला (Mumbai International Film Festival) आजपासून सुरुवात झाली आहे. 29 मे ते 5 जून दरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे. जगातील विविध कानाकोपऱ्यातील सिनेप्रेमी या महोत्सवाला हजेरी लावणार आहेत. दिग्गजांच्या उपस्थितीत हा महोत्सव पार पडणार आहे.
17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे तिकीट कुठे मिळेल?
17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्याची अनेक सिनेप्रेमींची इच्छा आहे. तर चाहत्यांना त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींना पाहायची संधी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मिळते. त्यामुळे प्रेक्षक या महोत्सवात जाण्याची उत्सुकतेने वाट पाहत असतात. सिनेप्रेक्षक http://miff.in या लिंकवरून तिकीट बुक करू शकतात. अथवा miffindia@gmail.com यावर संपर्क साधू शकतात.
सर्वोत्कृष्ट माहितीपटाला मिळणार 'सुवर्ण शंख' आणि 10 लाखाचे रोख पारितोषिक
महोत्सवातील सर्वोत्कृष्ट माहितीपटाला 'सुवर्ण शंख' आणि 10 लाखाचे रोख पारितोषिक मिळणार आहे. तसेच विविध श्रेणीतील विजेत्या चित्रपटांना आकर्षक रोख पारितोषिके, 'रौप्य शंख', ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. या महोत्सवात भारतीय नॉन-फिचर फिल्म विभागातील एका दिग्गज व्यक्तीला प्रतिष्ठित 'व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार' 10 लाख रुपये, ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
देश सध्या 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा करत आहे. त्यामुळेच या महोत्सवात 'इंडियाएटदरेट75' (India@75) या थीमवर आधारित सर्वोत्कृष्ट लघुपटाला विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. जगातील विविध कानाकोपऱ्यातील सिनेप्रेमी या महोत्सवाला हजेरी लावणार आहेत. तसेच दिग्गजांच्या उपस्थितीत हा महोत्सव पार पडणार आहे.
दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला होता 16 वा MIFF
17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देशासह परदेशातून 817 एन्ट्री आल्या होत्या. यात भारतासह जगभरातील अनेक माहितीपट, अॅनिमेशन आणि लघुपट निर्मात्यांनी सहभाग घेतला होता. ग्रँड ज्युरीमध्ये फ्रान्स, जपान, सिंगापूर, कॅनडा, बल्गेरिया आणि भारतातील दिग्गजांचा समावेश होता.
MIFF कधी होणार ? 29 मे ते 5 जून
MIFF तिकीट बुक कुठे करायचे ? http://miff.in
संबंधित बातम्या