एक्स्प्लोर

बकेट लिस्ट

आपल्या जगण्याकडे पुन्हा एकदा पाहायला लावणारा हा सिनेमा आहे असं म्हटलं तर वावगं ठरु नये. या सिनेमात काही लूप होल्स नक्की आहेत. पण माधुरी आणि इतर कलाकारांनी आपल्या अभिनयाने यावर मात केलेली दिसते.

माधुरी दीक्षित मराठी सिनेमात काम करणार याची चर्चा गावभर सुरु होती. ती कोणता सिनेमा करणार, कुणाचा सिनेमा करणार या सगळ्याची चर्चा होती. त्यामुळे आता ती नेमका काय सिनेमा करणार याकडे अनकेांचं लक्ष होतं. केवळ सिनेमा नव्हे, तर त्यासाठी ती कोणता दिग्दर्शक निवडणार, कोणत्या कलाकारांसोबत काम करणार या सगळ्याबाबत कमालीची उत्सुकता होती. माधुरीने आपल्या मराठी सिनेमासाठी निवडलेला दिग्दर्शक आहे, तेजस देओस्कर. तेजसने यापूर्वी 'प्रेमसूत्र' आणि 'अजिंक्य' या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तेजसचा हा तिसरा सिनेमा. 'बकेट लिस्ट'ची चर्चा, त्याची गोष्ट आता सर्वश्रुत आहेच. आता मुद्दा असा होता, की ही गोष्ट तो मांडतो कशी.. 'बकेट लिस्ट' म्हणजे काय, तर मरण्यापूर्वी जीवनात कराव्या वाटणाऱ्या गोष्टींची यादी करुन त्या पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणं. या सिनेमाची गोष्ट साधारण अशी, मधुरा साने यांना हृदय विकाराचा आजार आहे. त्यांचं हृदयरोपण करणं गरजेचं आहे. एक दाता मिळतो आणि मधुरा यांचं हृयरोपण होतं. मधुरा पुन्हा दैनंदिन आयुष्य जगू लागते. पण आपल्याला हे हृदय दिलं कुणी याची उत्सुकता तिला असते. ते दिलं असतं 20 वर्षाच्या सईने. या सईच्या घरच्यांना भेटण्याचा मधुरा प्रयत्न करते. भेटतेही. त्यामुळे तिला स्वच्छंदी सईचा स्वभाव कळतो. त्याचेवळी तिला सईची बकेट लिस्ट मिळते. आणि तिच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याचा विडा ती उचलते. सईच्या या इच्छांमुळे मधुराचं जगणं बदलतं. हा बदल म्हणजे नेमका काय.. तिला यासाठी काय संघर्ष करावा लागतो.. या सगळ्याची उत्तरं 'बकेट लिस्ट' पाहिल्यावर मिळतो. हा सिनेमा एक फिल गुड सिनेमा आहे, असं म्हणता येईल. माधुरी असल्यामुळे तिला एक ग्रेस आहेच. शिवाय वजनही आलं आहे. अभिनयाची खासियत अशी की यात रिटायर व्हायची गरज नसते. तुमच्या वयानुसार तुम्ही भूमिका करु शकता. म्हणूनच आज वयाच्या पंच्याहत्तरीत अमिताभ बच्चनही काम करतात. माधुरीने सिनेमा निवडताना आपल्या वयाचा अंदाज घेऊन सिनेमा आणि त्याची भूमिका निवडली आहे. पूर्वार्धात व्यक्तिरेखांचं नीट स्पष्टीकरण मिळतं. पण, त्याचेवळी पटकथेमध्ये आणखी विस्तार हवा होता असं वाटत राहतं. म्हणजे, मधुराची बाईक शिकणं असो, नाच असो.. यातलं घडणं मिसिंग वाटतं. म्हणजे, संवादांमधून आपल्याला ते मान्य करावं लागतं. पण गाडी शिकत असतानाचा स्ट्रगल मधुराचा दिसत नाही. उत्तरार्धातही अनेक प्रसंग अचानक समोर येतात आणि ते आपल्याला मान्य करावे लागतात. यात, मधुराचा पती मोहनचं अमेरिकेत जाणं.. मधुराने त्या निर्णयाचं केलेलं समर्थन हे सगळ एकामागोमाग येत जातं. मधुरा आणि तिच्या मुलांमधलं बॉण्डिंगही तितकं स्पष्ट होत नाही. अनेक संवाद विनाकारण आहेत की काय असं वाटत राहतं. पण पडद्यावर माधुरी असल्यामुळे आपण ते सगळं मान्य करतो. किंवा माफ करतो. उत्तरार्धात येणारी पियक्कड मधुराही मेटॅलिक आवाजामुळे खोटी किंबहुना ओल्ड स्कूल वाटू लागते. तो प्रसंग गंमत म्हणून ठिक आहे, पण, तो आणखी रिअॅलिस्टिक असायला हवा होता असं वाटत राहतं. यातली गाणी चांगली झाली आहेत. काही प्रसंगांमध्ये माधुरीचं दिसणं तर वेड लावतं. विशेषत: तिचं लाल गाऊनमध्ये येणं.. अस्सल नऊवारी साडीमध्ये सजणं लाजवाब आहे. माधुरीचा सेन्स ऑफ ह्युमरही गमतीदार आहे. स्टेजवर जाण्याआधी तिचं दुसऱ्याच दारात घुसणं असो किंवा बाईक शिकताना सवयीने हात सोडणं असो.. हे सगळं मस्त झालंय. एक मात्र सिनेमाभर तुम्हाला वाटत राहतं ते असं की माधुरीची भाषा तुम्हाला कानाला खटकते. म्हणजे चेहऱ्यावर हवे असणारे भाव ती देत असते, पण संवाद ऐकताना ते फिट वाटत नाहीत, नवखी भाषा जाणवत राहते. पण त्यावर उतारा म्हणून सिनेमात सुमित राघवन, शुभा खोटे, रेणुका शहाणे, दिलीप प्रभावळकर, प्रदीप वेलणकर, वंदना गुप्ते अशी तगडी फळी आहे. त्यासगळ्यांनीच माधुरीला एका अर्थाने सांभाळून घेतलं आहे. एकूणात हा फिल गुड सिनेमा आहे. आपल्या जगण्याकडे पुन्हा एकदा पाहायला लावणारा हा सिनेमा आहे असं म्हटलं तर वावगं ठरु नये. या सिनेमात काही लूप होल्स नक्की आहेत. पण माधुरी आणि इतर कलाकारांनी आपल्या अभिनयाने यावर मात केलेली दिसते. माधुरी मराठीत आली आहे, हा सिनेमा एकदा पाहायला हरकत नाही. म्हणूनच पिक्चर बिक्चरमध्ये या सिनेमाला मिळाला आहे लाईक.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी

व्हिडीओ

Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget