Ranchi: "धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव आणला, 'द केरळ स्टोरी' पाहिल्यानंतर तक्रार करण्याचं धैर्य मिळालं"; मॉडेलचे रांचीतील व्यक्तीवर गंभीर आरोप
एका मॉडेलनं रांची (Ranchi) येथील एका व्यक्तीवर गंभीर आरोप केले आहेत.
Ranchi: रांची (Ranchi) येथील एका व्यक्तीवर एका मॉडेलनं बलात्कार आणि धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तन्वीर अख्तर या नावाने ओळखल्या जाणार्या एका व्यक्तीने मॉडेलचे काही फोटो तिच्या कुटुंबीयांना पाठवले होते. मॉडेलनं याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे. तिनं सांगितलं की, रांचीमधील त्या व्यक्तीनं मला खोटे नाव सांगितले. 'द केरळ स्टोरी'चित्रपट पाहिल्यानंतर, मला त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदवण्याचे धैर्य मिळाले.'
एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती देताना मॉडेल म्हणाली, "लग्न करण्यासाठी आणि माझा धर्म बदलण्यासाठी तो माझ्यावर दबाव आणत होता. हे प्रकरण 2020 मध्ये सुरू झाले, जेव्हा मी त्याच्या मॉडेलिंग एजन्सीमध्ये सामील झाले होते. आधी त्याने मला त्याचे नाव यश असल्याचे सांगितले पण 4 महिन्यांनंतर त्याचे खरे नाव तन्वीर अख्तर असल्याचे मला समजले. तो माझे फोटो माझ्या कुटुंबातील सदस्यांना पाठवत होता आणि माझ्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट देखील करत आहे. त्याने मुंबईत मला मारण्याचाही प्रयत्न केला. 'द केरळ स्टोरी' चित्रपट पाहिल्यानंतर मला त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदवण्याचे धैर्य मिळाले."
#WATCH | "He was putting pressure on me to marry him and convert my religion. All this started in the year 2020 when I joined his modelling agency. Earlier he told me that his name is Yash but after 4 months, I got to know that his real name is Tanveer Akhtar. He is sending my… pic.twitter.com/Tp0UiMw9fy
— ANI (@ANI) May 31, 2023
मुंबईच्या वर्सोवा पोलीस स्टेशनने रांची येथील त्या व्यक्तीविरुद्ध कलम 376(2)(एन), 328,506,504,323 आणि आयटी कायद्याच्या कलम 67 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
रांचीचे एसएसपी किशोर कौशल यांनी सांगितले की, 'तक्रारदाराने 29 मे रोजी वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये मुंबई पोलिसांकडे तक्रार नोंदवली. ही घटना रांचीमध्ये घडल्याने हे प्रकरण रांची पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. आम्ही एफआयआर दाखल केला आहे आणि आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. पुढील कारवाई केली जाईल."
#WATCH | The complainant lodged a complaint with Mumbai Police at Versova Police Station on 29th May. Since the incident took place in Ranchi, this case was transferred to Ranchi Police. We have lodged a proper FIR and we are investigating this case. Further action will be taken:… pic.twitter.com/Vr4nrQSMYh
— ANI (@ANI) May 31, 2023
इतर महत्वाच्या बातम्या: