The Kerala Story Trailer: 'शालिनी' ही 'फातिमा' कशी झाली? एक नाही तर हजारो मुलींची कथा मांडणार 'द केरळ स्टोरी'
'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या चित्रपटाचा युट्यूबवर ट्रेंड होत आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना काय बघायला मिळणार आहे? हे जाणून घेऊयात...
The Kerala Story Trailer: सध्या सोशल मीडियावर 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या चित्रपटाची चर्चा होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरला युट्यूबवर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाचा युट्यूबवर ट्रेंड होत आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना काय बघायला मिळणार आहे? हे जाणून घेऊयात...
'द केरळ स्टोरी'ची कथा
'द केरळ स्टोरी' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर लक्षात येते की, या चित्रपटाची कथा ही अशा मुलींवर आधारित आहे ज्या कॉलेजमध्ये शिकत असतात. पण त्या ISIS मध्ये सामील होतात. त्या मुलींचे धर्मांतर केले जाते. केरळमधील हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून मुस्लिम बनवण्यात येते.
'द केरळ स्टोरी'ची स्टार कास्ट
अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बानी, सिद्धी इदनानी यांनी 'द केरळ स्टोरी' या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 5 मे 2023 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
काही दिवसांपूर्वी द केरळ स्टोरी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. या टीझरमध्ये दिसत आहे की, अदा शर्मा म्हणते,'माझं नाव आधी शालिनी उन्नीकृष्णन होते. मला नर्स होऊन लोकांची सेवा करायची होती. आता माझं नाव फातिमा बा आहे. मी आतंकवादी आहे. मी सध्या अफगाणिस्तान जेलमध्ये आहे. मी एकटी नाहीये माझ्या सारख्या 32 हजार मुली आहेत.'
अदाच्या अभिनयाचं होतंय कौतुक!
द केरळ स्टोरीच्या ट्रेलरमध्ये अदा शर्माच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. सोशल मीडियावर अनेक जण या चित्रपटाच्या ट्रेलरमधील अदाच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. या चित्रपटात अदानं शालिनी उन्नीकृष्णन ही भूमिका साकारली आहे. शालिनी फातिमा कशी झाली? हे 'द केरळ स्टोरी' या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.
अभिनेत्री अदा शर्मानं 1920 या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटामुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली. हा चित्रपट 2008 मध्ये प्रदर्शित झाला. हसी तो फसी, कमांडोः2, कमांडो 3 या चित्रपटांमध्ये अदानं काम केलं आहे. आता अदाच्या द केरळ स्टोरी या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळेल की नाही? या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल.
संबंधित बातम्या