Harnaaz Kaur Sandhu : माजी ‘मिस वर्ल्ड’ हरनाज कौर संधू अडचणीत, ‘द कपिल शर्मा शो’ फेम अभिनेत्रीने केले गंभीर आरोप!
Harnaaz Kaur Sandhu : माजी ‘मिस युनिव्हर्स’ हरनाज कौर संधूविरुद्ध (Harnaaz Kaur Sandhu) चंदीगड जिल्हा न्यायालयात केस दाखल करण्यात आली आहे.
Harnaaz Kaur Sandhu : माजी ‘मिस युनिव्हर्स’ हरनाज कौर संधूविरुद्ध (Harnaaz Kaur Sandhu) चंदीगड जिल्हा न्यायालयात केस दाखल करण्यात आली आहे. ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) फेम अभिनेत्री उपासना सिंह (Upasna Singh) हिने हरनाजविरोधात दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उपासन सिंह हिने गुरुवारी वकिलांमार्फत ही केस दाखल केली आहे. उपासनाने हरनाजवर आरोप करताना म्हटले की, ती एका चित्रपटाची निर्मिती करत होती, ज्यामध्ये हरनाजने काम करण्यास होकार दिला होता. यानंतर, चित्रपट पूर्ण झाल्यानंतर ती प्रमोशनसाठी कधीही आली नाही आणि आता तिने फोन उचलणे देखील बंद केले आहे. तिच्याकडे हरनाजविरोधात काही पुरावे देखील आहेत. आता न्यायालयाकडून हरनाजला समन्स बजावण्यात येणार आहे.
अभिनेत्री उपासना सिंह पंजाबी चित्रपटांमध्येही काम करते आणि पंजाबी चित्रपटांची निर्मिती देखील करते. हरनाज कौर संधू ही उपासना सिंह दिग्दर्शित ‘बाईजी कुट्टन गई’ या पंजाबी चित्रपटाची अभिनेत्री आहे. याच चित्रपटाच्या संदर्भात ही केस दाखल करण्यात आली आहे. उपासना सिंह यांनी याबाबत हरनाज कौरवर गंभीर आरोप केले आहेत. उपासना सिंहने तिचे वकील करण सचदेवा यांच्यामार्फत ‘मिस युनिव्हर्स’विरोधात कोर्टात ही याचिका दाखल केली असून, यात कराराचा भंग आणि नुकसानीचा दावा दाखल केला आहे.
उपसनाने मागितली नुकसानभरपाई
उपासना सिंहने हरनाज विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. उपासना सिंह म्हणाली की, आमच्यात झालेल्या कॉन्ट्रॅक्टनुसार हरनाजला 25 दिवसांसाठी चित्रपटाचे प्रमोशन करायचे होते. मात्र, आता तिने केवळ पाच दिवसच चित्रपटाचे प्रमोशन केले तरीही फायदा होईल. उपासनाच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, उपासनाने कोर्टात नुकसान भरपाईचा दावा केला आहे.
हरनाज करतेय दुर्लक्ष
उपासना सिंह 'बाईजी कुट्टन गई'ची निर्माती आहे. या चित्रपटात हरनाज संधूने मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले होते. पण, आता हरनाजने या चित्रपटासाठी काम करणे बंद केले आहे. ती उपसानाचा फोनही उचलत नाहीय आणि त्यांच्या कोणत्याही मेल किंवा मेसेजला उत्तरही देत नाही. यामुळे आता उपासनाने कोर्टात धाव घेत नुकसानभरपाई मागितली आहे.
पंजाबच्या हरनाज संधूने ‘मिस युनिव्हर्स 2021’चा खिताब जिंकून संपूर्ण देशाचे नाव उंचावले आहे. भारताने 21 वर्षांनंतर ही स्पर्धा जिंकली. हरनाज कौर संधूच्या आधी अभिनेत्री सुष्मिता सेन आणि अभिनेत्री लारा दत्ता यांनी ‘मिस युनिव्हर्स’चा किताब पटकावला होता.
इतर बातम्या :
Harnaaz kaur Sandhu: मिस युनिव्हर्सने शेअर केलं नवं फोटोशूट; चाहते म्हणाले वाह!