एक्स्प्लोर

मिनाक्षी थापा हत्या प्रकरण : अटकेतील दोन्ही आरोपी दोषी

2012 साली घडलेल्या मिनाक्षी थापा हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेल्या अमित जयस्वाल आणि प्रीती सरिन या दोघांना मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरलं.

मुंबई : बॉलिवूडमध्ये नाम कमवण्याचं स्वप्न उराशी बाळगून मुंबईत आलेल्या एका उदयोन्मुख तरुणीची अतिशय निर्घृणपणे हत्या करणाऱ्या दोन ज्युनिअर आर्टिस्टना मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं. 2012 साली घडलेल्या मिनाक्षी थापा हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेल्या अमित जयस्वाल आणि प्रीती सरिन या दोघांना मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरलं. आयपीसी कलम 302, 364(अ), 120(बी), 201 आणि आयटी अॅक्टखाली या दोघांना दोषी ठरवण्यात आलं. विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे गुरुवारी या दोघांच्या शिक्षेवर युक्तीवाद करतील. काय आहे प्रकरण? देहरादूनहून मुंबईत येण्याआधी 26 वर्षीय मिनाक्षी थापा ही डान्स स्कूल आणि स्केटिंग स्कूलमध्ये इंस्ट्रक्टर म्हणून काम करत होती. मुंबईत आल्यावर तिने फ्रँकफिनमध्येही कोर्स केला. आपल्या मेहनतीने तिने 'सहेर', '404' अशा काही हिंदी सिनेमांत छोटे-छोटे रोल्सही मिळवले होते. मधुर भंडारकर यांच्या 'हिरॉईन' या सिनेमाच्या सेटवर मिनाक्षीची अमित जयस्वाल आणि प्रीती सरिन या दोन ज्युनिअर आर्टिस्टशी ओळख झाली. या दोघांना प्रीतीने आपण एका श्रीमंत घरातून असल्याची माहीती दिली. तसेच आपण केवळ आवड म्हणून बॉलिवूडमध्ये काम करत असल्याचं तिने या दोघांना सांगितलं. याचाच फायदा घेऊन अमित आणि प्रीतीने मिनाक्षीचं पैशांसाठी अपहरण केलं. अपहरण केल्यानंतर त्यांनी थापा कुटुंबीयांकडून 15 लाखांची मागणी केली. मिनाक्षीच्या आईन कसेबसे 60 हजार रुपये जमा केले. यावरुन त्यांना मिनाक्षीच्या फोलपणाची कल्पना आली. त्यानंतर त्यांनी अलाहबाद इथे मिनाक्षीचं डोकं धडापासून वेगळं करत तिची हत्या केली. मिनाक्षीचं धड अलाहबादच्या एका गटारात टाकून तिच्या धडासह दोघे बसने गोरखपूरला रवाना झाले. पुढे चालत्या बसमधून त्यांनी मिनाक्षीचं मुंडकं रस्त्यात फेकून दिलं. जे आजवर पोलिसांना सापडलेलं नाही. मिनाक्षीची हत्या करुन अमित आणि प्रीतीने तिचा मोबाईल आणि एटीएम कार्ड आपल्या ताब्यात घेतलं होतं. जेणेकरून तिच्या अकाऊंटमधील पैसे सहज काढता येतील. अमित जयस्वाल आणि प्रीती सरीन कोण आहेत? अमित जयस्वाल आणि प्रीती सरीन हे दोघेही मूळचे अलाहाबादचे आहेत. अमितचे वडील हे तिथे एक नामांकीत वकील आहेत. अमितचं लग्न झालं असून त्याला दोन मुलंही आहेत. अमितला सुरुवातीपासूनच शानशौकीत राहण्याची आवड होती. तसेच त्याला फिल्मी दुनियेचं विलक्षण आकर्षण होतं. अमित अलाहबादमध्ये एक कोचिंग क्लास चालवायचा. तिथेच त्याची प्रीतीशी ओळख झाली. प्रीतीचे वडील तिथे एका शाळेत काम करतात. प्रीतीलाही फिल्मी दुनियेचं वेड होतं. त्यामुळे या दोघांच्या मैत्रीचं पुढे प्रेमात रुपांतर झालं. घरच्यांच्या विरोधाला कंटाळून एक दिवस दोघांनी अलाहबाद सोडलं आणि मुंबई गाठली आणि सिनेमात छोटीमोठी कामं करू लागले. दरम्यान, मुळातच उंची राहणीमानाचं आकर्षण असल्याने लवकरच त्यांना पैशांची चणचण भासू लागली. मग झटपट पैसे कमवण्याच्या नादात असतानाच त्यांची मिनाक्षीशी ओळख झाली. झटपट श्रीमंतीच्या नादात त्यांनी मिनाक्षीचं आधी पैशांसाठी अपहरण केलं आणि मग निर्घृण हत्या केली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश

व्हिडीओ

Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Pradnya Satav Join BJP : राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश - प्रज्ञा सातव
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Hasan Mushrif: दुर्दैव! ऐन निवडणुकीत हसन मुश्रीफांनी 'या' नेत्याशी दोस्ती तोडली; म्हणाले, त्यांच्यातील आणि आमच्यातील दोरी तुटली
दुर्दैव! ऐन निवडणुकीत हसन मुश्रीफांनी 'या' नेत्याशी दोस्ती तोडली; म्हणाले, त्यांच्यातील आणि आमच्यातील दोरी तुटली
Embed widget