Mili Movie New Poster: जान्हवी कपूरच्या 'मिली' चित्रपटाचं पोस्टर रिलीज; चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित
जान्हवी कपूरच्या (Janhvi Kapoor) मिली या चित्रपटाचा नवा पोस्टर रिलीज झाला आहे.
Mili Movie New Poster: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूरच्या (Janhvi Kapoor) आगामी चित्रपटांची वाट तिचे चाहते उत्सुकतेने बघत असतात. तिच्या मिली या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. या टीझरमधील जान्हवीच्या भूमिकेनं अनेकांचे लक्ष वेधले. तिच्या 'मिली' या थ्रिलर चित्रपटचे नवे पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहे.
जान्हवीची या चित्रपटात भूमिका कोणती आहे? तिच्यासोबत या चित्रपटात कोणते सेलिब्रिटी काम करणार आहेत? असे काही प्रश्न नेटकऱ्यांना पडले होते. आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या नव्या पोस्टमधून नेटकऱ्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तर मिळाली आहे. चित्रपटाच्या नव्या पोस्टरमध्ये सनी कौशल आणि मनोज पाहवासोबत तिचे बॉन्डिंग दिसून येत आहे. जान्हवीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती सनी कौशल आणि मनोज पाहवासोबत बाईकवर बसलेली दिसत आहे. पोस्टरमध्ये "डायिंग टू सर्व्हायव्ह" असे लिहिले आहे, तर जान्हवीने पोस्टरला कॅप्शन दिले आहे की, 'कठीण प्रसंगातच खरी नाती साथ देतात.'
जान्हवी कपूरशिवाय 'मिली' चित्रपटात सनी कौशलदेखील तिच्या प्रियकराच्या भूमिकेत तर मनोज पाहवा तिच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. हसलीन कौर,राजेश जैस या कलाकारांनी देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटाची कथा ‘मिली नौडियाल’या मुलीची आहे जी, फ्रिजर रुममध्ये अडकते. जिवंत राहण्यासाठी मिली धडपडते. हा चित्रपट 4 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
'मिली'हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या हेलन या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मथुकुट्टी झेवियर यांनी केले होते. जान्हवी कपूरचे वडील आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते बोनी कपूर यांच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
वाचा सविस्तर बातम्या:
Mili Teaser: 'फ्रिजर रुम' मध्ये अडकलेल्या तरुणीची गोष्ट; जान्हवी कपूरच्या 'मिली'चा टीझर पाहिलात?