(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MIFF : 17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला 29 मे पासून होणार सुरुवात
MIFF 2022 : 17 वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ) 29 मे ते 4 जून 2022 या कालावधीत होणार आहे.
MIFF 2022 : 17 वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ) (MIFF) 29 मे ते 4 जून 2022 या कालावधीत होणार आहे. या साठी 15 फेब्रुवारी पासून प्रवेशिका स्विकारल्या जाणार आहेत. 1 सप्टेंबर 2019 आणि 31 डिसेंबर 2021 दरम्यान पूर्ण झालेले चित्रपट मिफ्फ महोत्सवामध्ये (MIFF-2022) प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत.
महोत्सवातील सर्वोत्कृष्ट माहितीपटाला 'सुवर्ण शंख' आणि 10 लाखाचे रोख पारितोषिक मिळणार आहे. तसेच विविध श्रेणीतील विजेत्या चित्रपटांना आकर्षक रोख पारितोषिके, 'रौप्य शंख', ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. या महोत्सवात भारतीय नॉन-फिचर फिल्म विभागातील एका दिग्गज व्यक्तीला प्रतिष्ठित 'व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार' 10 लाख रुपये, ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
देश सध्या 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा करत आहे. त्यामुळेच या महोत्सवात 'इंडियाएटदरेट75' या थीमवर आधारित सर्वोत्कृष्ट लघुपटाला विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे.
View this post on Instagram
2020 साली झालेल्या 16 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला स्पर्धकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. यात देशविदेशातील स्पर्धक सहभागी झाले होते. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्स हा सर्वात जुना आणि मोठा चित्रपट महोत्सव आहे.
संबंधित बातम्या
Gangubai Kathiawadi Controversy : 'गंगूबाई काठियावाडी'वरून नवा वाद, मुलगा म्हणाला 'माझी आई समाजसेविका होती, पण चित्रपटात....'
Deep Sidhu : दीप सिद्धू पूर्णपणे स्टेअरिंगमध्ये अडकला होता, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भीषण अपघाताची कहाणी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha