Gangubai Kathiawadi Controversy : 'गंगूबाई काठियावाडी'वरून नवा वाद, मुलगा म्हणाला 'माझी आई समाजसेविका होती, पण चित्रपटात....'
Gangubai Kathiawadi Controversy : गंगूबाईंच्या कुटुंबीयांनी या चित्रपटावर नाराजी व्यक्त केली असून, आता याबाबत न्यायालयात धाव घेतली आहे.
Gangubai Kathiawadi Controversy : 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या चित्रपटाची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. मात्र रिलीजपूर्वीच तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटात आलिया भट्ट (Alia Bhatt) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता अजय देवगण देखील यात कॅमिओ रोल करत आहे. मात्र, गंगूबाईंच्या कुटुंबीयांनी या चित्रपटावर नाराजी व्यक्त केली असून, आता याबाबत न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या वकिलाचे म्हणणे आहे की, ट्रेलर पाहून कुटुंबीयांना धक्का बसला आहे. समाजासाठी इतकं काम करणाऱ्या एका महिलेला या चित्रपटात केवळ कामाठीपुरातील एक व्यक्ती दाखवलं आहे.
गंगूबाई यांचा दत्तक मुलगा बाबू रावजी शाह यांनी 2021मध्येही या चित्रपटाबाबत याचिका दाखल केली होती. या प्रकरणी मुंबईतील न्यायालयाने संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट यांना समन्स बजावले होते. मुंबई उच्च न्यायालयाने नंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला आणि निर्मात्यांविरुद्ध गुन्हेगारी मानहानीच्या कारवाईला अंतरिम स्थगिती दिली. याबद्दल आजतकशी बोलताना बाबू रावजी शाह म्हणाले की, 'माझ्या आईला एका वेगळ्याच कॅरेक्टरमध्ये बसवण्यात आलं आहे. आता लोक विनाकारण माझ्या आईबद्दल काहीही बोलत आहेत.’
चित्रण चुकले आहे!
गंगूबाईंच्या कुटुंबीयांचे वकील नरेंद्र म्हणाले की, ‘गंगूबाईंचे चित्रण चुकीचे आणि निराधार आहे. हे अश्लील आहे. एका समाजसेविकेला तुम्ही अशा प्रकारे सादर केले आहे. हे कोणत्या कुटुंबाला आवडेल? त्यांना व्हॅम्प आणि लेडी डॉन बनवण्यात आले आहे.'
वकिलांने पुढे सांगितले की, 'जेव्हा घरच्यांना कळले की गंगूबाईच्या जीवनावर चित्रपट बनत आहे, तेव्हापासून त्यांना घराबाहेर पडणे देखील अशक्य झाले आहे. ते घर देखील शिफ्ट करत आहेत. या चित्रपटात गंगूबाईंचे चित्रण ज्याप्रकारे करण्यात आले आहे, ते पाहता गंगूबाई खरोखरच अशा होत्या का, त्या समाजसेविका होत्या का, असे अनेक प्रश्न अनेक नातेवाईक विचारत आहेत.’
आम्ही संजय लीला भन्साळी आणि लेखक हुसैन झैदी यांना नोटिसा पाठवल्या आहेत, पण त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही. गंगूबाईंची नात भारती म्हणाल्या की, निर्माते पैशासाठी त्यांच्या कुटुंबाची बदनामी करत आहेत, हे त्यांना मान्य नाही. चित्रपटासाठी कुटुंबाची संमती घेण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला. इतकेच नव्हे तर, पुस्तक लिहिण्यासाठी देखील त्यांच्याकडून परवानगी घेण्यात आली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :
- Mika Singh : मिका सिंहकडून बप्पीदांना सांगीतिक श्रद्धांजली, गाण्यांमधून दिला ‘गोल्डन सिंगर’च्या आठवणींना उजाळा!
- Devednra Fadnavis, Amruta Fadnavis : काय म्हणता? देवेंद्र फडणवीस पातेलंभर तुपासकट 30 ते 35 पोळ्या खायचे, अमृता फडणवीसांनीच सांगितलं...
- Dadasaheb Phalke Death Anniversary : दादासाहेब फाळकेंच्या ‘हलत्या चित्रां’चं स्वप्न पुढे मनोरंजन विश्व बनलं! जाणून घ्या त्यांच्या प्रवासाबद्दल...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha