एक्स्प्लोर

March 2023 Movies Release : मार्च महिन्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; बॉक्स ऑफिसवर रणबीर-अजय येणार आमने-सामने

March Movie Release : मार्च महिन्यात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.

March Movie Release : सिनेरसिकांसाठी मार्च महिना खूपच खास असणार आहे. या महिन्यात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. अनेक बिग बजेट सिनेमे या महिन्यात प्रदर्शित होणार आहेत. रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) 'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhoothi Main Makkaar) या सिनेमापासून ते अजय देवगन (Ajay Devgn) 'भोला' (Bholaa) या सिनेमापर्यंत अनेक सिनेमे मार्च महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 

तू झूठी मैं मक्कार (Tu Jhoothi Main Makkaar)
कधी प्रदर्शित होणार? 8 मार्च 

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) 'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhoothi main Makkar) हा सिनेमा येत्या 8 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून रणबीर आणि श्रद्धाची जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून आता सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. 

शुभ निकाह (Shubh Nikah)
कधी प्रदर्शित होणार? 10 मार्च

'शुभ निकाह' (Shubh Nikah) हा सिनेमा 10 मार्चला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अक्क्षा परदासनी, पंकज बेरी, गोविंद नामदेव हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. दोन वेगळ्या जाती-धर्माच्या मुला-मुलींना लग्नासाठी येणाऱ्या अडचणींवर आधारित असलेल्या या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा भूपेंद्र सिंह संधू ने सांभाळली आहे. 

मिसेज चॅटर्जी वर्सेस नॉर्वे (Mrs Chatterjee Vs Norway)
कधी प्रदर्शित होणार? 17 मार्च

रानी मुखर्जीचा 'मिसेज चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' Mrs Chatterjee Vs Norway) हा सिनेमा 17 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशिमा छिब्बरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या 'मिसेज चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' या सिनेमात रानी आईच्या भूमिकेत दिसणार आहे. 

भीड (Bheed)
कधी प्रदर्शित होणार? 24 मार्च

राजकुमार राव आणि भूमी पेडनेकरचा 'भीड' हा सिनेमा 24 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. अनुभव सिन्हाने दिग्दर्शित केलेल्या या सिननेमात राजकुमारसह आशुतोष राणादेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

भोला (Bholaa)
कधी प्रदर्शित होणार? 29 मार्च 

अजय देवगनचा 'भोला' हा सिनेमा 29 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अंगावर शहारे आणणारा या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून त्यांना आता सिनेमाची प्रतीक्षा आहे. या सिनेमात तब्बू, संजय मिश्रा आमि मकरंद देशपांडे मुख्य भूमिकेत आहेत. 

सातरचा सलमान (Satarcha Salman)
कधी प्रदर्शित होणार? 3 मार्च

'सातारचा सलमान' हा सिनेमा येत्या 3 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात सुयोग गोऱ्हे, शिवानी सुर्वे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे मुख्य भूमिकेत आहेत. तगडी स्टारकास्ट असल्याने या सिनेमाची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता आहे. 

संबंधित बातम्या

Satarcha Salman : सिनेमासाठी अख्ख गावचं रंगलं, 'सातारचा सलमान' चित्रपटासाठी गावातील घरं झाली रंगीबेरंगी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
BJP : भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
IND vs SA 5th T20 Playing 11: अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर? संभाव्य प्लेईंग 11
अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार

व्हिडीओ

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Ajit Pawar On Manikrao Kokate : अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
BJP : भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
IND vs SA 5th T20 Playing 11: अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर? संभाव्य प्लेईंग 11
अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
VB-G-RAM-G: लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
BMC Electin: मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; अमित साटम म्हणाले, 'धनुष्यबाण, कमळ दोन्ही एकच आहेत, कोणत्याही कारणाने युती तुटणार नाही'
मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; अमित साटम म्हणाले, 'धनुष्यबाण, कमळ दोन्ही एकच आहेत, कोणत्याही कारणाने युती तुटणार नाही'
Savari Drugs Case : मुलुंडच्या फूटपाथवरील ड्रग्जकांड साताऱ्यातील सावरीपर्यंत कसं पोहोचलं, शिंदेंच्या भावाचं नाव कसं आलं? हादरवणारी कहाणी
मुलुंडच्या फूटपाथवरील ड्रग्जकांड साताऱ्यातील सावरीपर्यंत व्हाया पुणे कसं पोहोचलं, शिंदेंच्या भावाचं नाव कसं आलं? हादरवणारी कहाणी
Embed widget