Jakkal : पुण्यात घडलेल्या भीषण हत्याकांडावर आधारित मराठी वेब-सिरीज 'जक्कल'; लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Jakkal : 'जक्कल' ही मराठी वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Jakkal : जिओ स्टुडिओज लवकरच 'जक्कल' (Jakkal) नावाची मराठी वेबसीरिज घेऊन येत आहेत. 1970 च्या दशकात पुण्यात घडलेल्या खळबळजनक हत्याकांडावर आधारित हा वेब शोअसून सामान्य मध्यमवर्गातील मुलं कळत नकळतपणे जेव्हा गन्हेगारीच्या मार्गावर वळतात आणि ते कोणत्या टोकाला जाऊ शकतात याचा शोध घेणारी ही मालिका असणार आहे.
दिग्दर्शक विवेक वाघ यांची ही संकल्पना असून ते गेल्या चार वर्षांपासून या विषयावर काम करत आहेत. विवेक वाघ यांना 2020 मध्ये याच विषयावर आधारित 'बेस्ट इन्वेस्टिगेटिव्ह डॉक्युमेंट्री' (Best Investigative Documentary) हा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. या मालिकेची निर्मिती ए कल्चर कॅनव्हास एंटरटेनमेंट प्रोडक्शनचे शिवम यादव आणि कार्तिकी यादव यांनी केली आहे.
जक्कल संदर्भात बोलताना दिग्दर्शक विवेक वाघ म्हणाले “1976 ते 1977 या काळात पुण्यासारख्या पेन्शनर आणि सांस्कृतिक शहरात दोन आणीबाणी लागू झाल्या एक दिल्लीची आणि दुसरी जक्कलची.
View this post on Instagram
आणि म्हणूनच खळबळ जनक हत्याकांड, क्रूर हत्या या पलीकडे काय आहे जक्कल? जक्कल हे आडनाव आहे का ही वृत्ती ? आणि या मध्ये अडकलेल्या त्या 10 निरपराध लोकांचं काय?
महत्वाचं म्हणजे एक कलाकार खुनी होता का एक खुनी दुर्देवीने कलाकार होता, याचा धांडोळा 'जक्कल' या वेबसीरिजमध्ये करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या