एक्स्प्लोर

Cobra Box Office Collection : विक्रमच्या ‘कोब्रा’चा बॉक्स ऑफिसवर मोठा विक्रम, पहिल्याच दिवशी जमवला ‘इतका’ गल्ला!

Cobra Box Office Collection : अभिनेता विक्रम 3 वर्षांच्या ब्रेकनंतर या चित्रपटातून पुन्हा मोठ्या पडद्यावर परतला आहे. 'कोब्रा'ची ओपनिंग अपेक्षेपेक्षा जास्त धमाकेदार झाली आहे.

Cobra Box Office Collection : तमिळ सुपरस्टार चियान विक्रम (Chiyaan vikram) आणि अभिनेत्री श्रीनिधी शेट्टी (Sreenidhi Shetty) स्टारर दिग्दर्शक आर. अजय ज्ञानमुथु यांच्या ‘कोब्रा’ (Cobra) चित्रपटाने पहिल्याच दिवशी धमाकेदार सुरुवात केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट धमाकेदार ओपनिंग मिळवण्यात चित्रपट यशस्वी झाला आहे. अजय गन्नामुथु दिग्दर्शित या चित्रपटात चियान विक्रमसोबत श्रीनिधी शेट्टी मुख्य भूमिकेत आहे. हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक होता.

अभिनेता विक्रम 3 वर्षांच्या ब्रेकनंतर या चित्रपटातून पुन्हा मोठ्या पडद्यावर परतला आहे. 'कोब्रा'ची ओपनिंग अपेक्षेपेक्षा जास्त धमाकेदार झाली आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी केवळ तामिळनाडूमध्ये 12 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह हा चित्रपट विक्रमच्या करिअरमधील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी चित्रपट ठरला आहे.

पहिल्याच दिवशी चित्रपटाचा विक्रम!

या चित्रपटाने पहिल्या दिवशी तेलुगू बॉक्स ऑफिसवर 4.25 कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटाने कर्नाटकात 2 कोटी आणि केरळमध्ये 1.65 कोटींचा व्यवसाय केला आहे. तर, इतर राज्यांतून या चित्रपटाने एकूण 60 लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे. यासह चित्रपटाने संपूर्ण बॉक्स ऑफिस कमाईचा आकडा 19.50 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

'कोब्रा'ची तगडी स्टार कास्ट

माजी क्रिकेटपटू इरफान पठाण या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. या चित्रपटात चियान विक्रमसोबतच अभिनेत्री श्रीनिधि शेट्टी देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. त्याच बरोबर मिया जॉर्ज, रोशन मॅथ्यू, सरजानो खालिद, पद्मप्रिया, मोहम्मद अली बेग, कनिहा, मिरनालिनी रवि, मीनाक्षी आणि के.एस. रविकुमार हे कलाकार देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट 31 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच तमिळ, तेलुगू आणि हिंदी भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. आर. अजय. ज्ञानमुथु यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर सेव्हेन स्क्रीन स्टुडिओनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हरीश कन्नन यांनी या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केली आहे.

चियान विक्रमचे आगामी चित्रपट

कोब्रा बरोबरच चियान विक्रम चा ‘पोन्नियिन सेल्वन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन, कार्थी, जयम रवि, तृषा, प्रकाश राज आणि शोभिता धूलिपाला हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. प्रेक्षक विक्रमच्या आगमी चित्रपटांची वाट उत्सुकतेने बघत आहेत. चियान विक्रमच्या अन्नियान,ढोल, सामी, पिठमागन या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. अन्नियान या चित्रपटातील विक्रमच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.

हेही वाचा :

Entertainment News Live Updates 2 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget