NCP VS NCP Alliance : घड्याळ, तुतारीच्या आघाडीची अजितदादांकडून घोषणा! Special Report
ज्या पक्षांना एकमेकांसोबत युती किंवा आघाडी करायची असते, त्या पक्षाचे पदाधिकारी बैठक घेतात आणि जागांवर चर्चा करतात. वाटाघाटी यशस्वी झाल्या तर आघाडी होते. नाही झाल्या तर युती तुटते. ही झाली सर्वसाधारण प्रक्रिया. पण एखादा पक्ष एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी बोलणी करू लागला आणि बोलणी करता करता अचानक गायब होऊन दुसऱ्याच पक्षाशी सूत जुळवू लागला, तर काय होतं, याचं उदाहरण पुण्यात दिसून आलं. गोष्ट आहे पुण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या युतीची. याच गोष्टीचा सविस्तर आढावा राजकीय शोलेच्या या खास रिपोर्टमध्ये.
पुण्याच्या वेशीवर असणारा कात्रजचा घाट दाखवणे म्हणजे नेमकं काय, याची अनुभूती पुण्यातल्या महाविकास आघाडीला कशी आली, ते दाखवणारी ही तीन वक्तव्यं.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या आठवड्यापासूनच सुरु होती.
त्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठका सुरु झाल्या.
भाजपसोबत जाणाऱ्या अजितदादांशी आघाडी मान्य नसल्यामुळं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप काँग्रेसवासी झाले.
असं सगळं घडत असताना दोन दिवसांपूर्वी यात मोठा ट्विस्ट आला.
तुतारीचे उमेदवारही घड्याळावरच लढतील, ही अजितदादांची अट मान्य नसल्याचं निमित्त करत आघाडी होणार नसल्याचं अंकुश काकडेंनी जाहीर केलं.
All Shows

































