Rakee Jadhav Join BJP : तिकीटाविना बंड, नाराजी उदंड, राखी जाधव भाजपात!
निवडणुकीची दगदग आणि लगबग कितीही असली तरी सगळ्याच राजकीय पक्षाच्या प्रमुखांना स्वतःच्या तब्येतीसाठी वेळ काढायला हवा... विशेषतः मानसिक स्वास्थ्यासाठी...आता आम्ही हा सल्ला देण्यामागचं कारणही तसंच आहे.. कारण सध्या तिकीट वाटपाला सुरूवात झालीय.. एकाला तिकीट दिल्यानंतर चार ते पाच जणांकडून नाराजीची आणि बंडाची तलवार उपसली जातेय.. आणि ही नाराजी थोपवताना सगळ्याच पक्षश्रेष्ठींची चांगलीच दमछाक होतेय.. चांदा ते बांदा नाराजीचे वारे कसे वाहताहेत पाहुयात राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट
उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्याबाहेर जमलेली ही गर्दी...
मुंबईचा नगरसेवक बनण्याचं स्वप्न घेऊन ही मंडळी इथे आली आहेत..
मातोश्री बंगल्यात प्रवेश करताना मनाच्या एका कोपऱ्यात आशा आहे तर दुसऱ्या कोपऱ्यात धाकधूक..
तर मातोश्री बंगल्यातून बाहेर पडताना काही जण हातात एबी फॉर्म आणि चेहऱ्यावर हसू घेऊन बाहेर पडले...
तर काही जण आपल्या पदरात निराशा घेऊन मातोश्रीचा उंबरठा ओलांडत होते...
एबी फॉर्म न मिळाल्यामुळे ज्याप्रमाणे तळागळातले कार्यकर्ते नाराज आहेत, त्याचप्रमाणे आपल्या माणसाला तिकीट न मिळाल्यामुळे बडे नेते देखील रुसून बसल्याचं समजतंय
All Shows

































