Telly Masala : 'सत्यशोधक'ची रिलीज डेट जाहीर ते मितालीच्या 'त्या' उत्तराने वेधलं लक्ष ; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Vikram Gokhale : विक्रम गोखलेंचा शेवटचा सिनेमा होणार रिलीज! 'सूर लागू दे'चं नवं पोस्टर आऊट
Vikram Gokhale New Marathi Movie Sur Lagu De : विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचा 'सूर लागू दे' (Sur lagu De) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमाचं नवं पोस्टर आऊट झालं आहे. पोस्टर रिलीज झाल्याने प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 12 जानेवारी 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Vanita Kharat : ‘सुंदरी’ मालिकेत वनिता खरातची एन्ट्री; लूकनं वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, "फायर है तू"
Vanita Kharat : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) ही आता एका नव्या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच 'सुंदरी' (Sundari) या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमधील वनिताच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Manoj Jarange : रितेश देशमुख ते हेमंत ढोमे; मराठा आरक्षणाबाबत मराठी सेलिब्रिटींच्या पोस्ट चर्चेत
Marathi Celebrity On Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण मिळावं यासाठी उपोषण करत आहेत. आज त्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील उपोषणाचा आठवा दिवस आहे. जरांगेंची प्रकृती खालावत असल्याने राज्यभरातील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हेमंत ढोमेसह (Hemant Dhome) अनेक सेलिब्रिटींनी मनोज जरांगे आणि मराठा आरक्षणाबाबात पोस्ट शेअर केल्या आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Satyashodhak : ‘सत्यशोधक’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर; 'हा' अभिनेता साकारणार महात्मा ज्योतिराव फुलेंची भूमिका
Satyashodhak : समस्त स्त्री वर्गाला शिक्षणाचा योग्य मार्ग दाखवणारे आणि संघर्ष, विरोध पत्करून प्रत्येक स्त्री शिकलीच पाहिजे असा आग्रह धरून स्वतः या शिक्षणाच्या यज्ञकुंडात उतरलेले महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भव्यदिव्य ‘सत्यशोधक’ (Satyashodhak) या चित्रपटाचे लूक रिव्हील पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Mitali Mayekar : “नग्न झाल्यावर फिल्ममध्ये काम मिळतं का?”; नेटकऱ्याचा प्रश्न, मितालीच्या उत्तरानं वेधलं लक्ष
Mitali Mayekar: अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) ही सोशल मीडियावर विविध लूक्समधील फोटो शेअर करत असते. मिताली ही तिच्या बिकिनी फोटोशूटचे फोटो देखील शेअर करते. काही नेटकरी मितालीच्या फोटोला कमेंट करुन अनेकांनी तिला ट्रोल करतात. नुकताच मितालीनं तिचा पिंक बिचवरील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती व्हाईट आऊटफिटमध्ये दिसत आहे. या फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं मितालीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला पण मितालीनं या ट्रोलरच्या कमेंटला सडेतोड उत्तर दिलं आहे.