Mitali Mayekar: “नग्न झाल्यावर फिल्ममध्ये काम मिळतं का?”; नेटकऱ्याचा प्रश्न, मितालीच्या उत्तरानं वेधलं लक्ष
नुकताच मितालीनं (Mitali Mayekar) तिचा पिंक बिचवरील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.या फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं मितालीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
![Mitali Mayekar: “नग्न झाल्यावर फिल्ममध्ये काम मिळतं का?”; नेटकऱ्याचा प्रश्न, मितालीच्या उत्तरानं वेधलं लक्ष Mitali Mayekar slams netizen who comment on her outfit gave savage reply Mitali Mayekar: “नग्न झाल्यावर फिल्ममध्ये काम मिळतं का?”; नेटकऱ्याचा प्रश्न, मितालीच्या उत्तरानं वेधलं लक्ष](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/01/ee7ef3ca4d4cae4c652cf0914817451b1698828020843259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mitali Mayekar: अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) ही सोशल मीडियावर विविध लूक्समधील फोटो शेअर करत असते. मिताली ही तिच्या बिकिनी फोटोशूटचे फोटो देखील शेअर करते. काही नेटकरी मितालीच्या फोटोला कमेंट करुन अनेकांनी तिला ट्रोल करतात. नुकताच मितालीनं तिचा पिंक बिचवरील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती व्हाईट आऊटफिटमध्ये दिसत आहे. या फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं मितालीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला पण मितालीनं या ट्रोलरच्या कमेंटला सडेतोड उत्तर दिलं आहे.
मितालीनं शेअर केलेल्या पिंक बिचवरील फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, “नग्न झाल्यावर फिल्ममध्ये काम मिळतं का?”. या कमेंटला मितालीनं रिप्लाय दिलं, "माहिती नाही बुवा! बघा प्रयत्न करून." मितालीनं दिलेल्या या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी तिचा स्पेनमधील (Spain) एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये मिताली ही ओरेंज प्रिंटेड बिकीनी, मोठे इअरिंग्स आणि हातात ब्रेसलेट अशा लूकमध्ये दिसली. मितालीनं या फोटोला कॅप्शन दिलं, 'कमेंट्स सेक्शनमध्ये मला ‘आपली संस्कृती’ चे ज्ञान देण्याचा प्रयत्नही करू नका, तुम्हाला स्वत:चीच लाज वाटेल.' मितालीच्या या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स आणि लाइक केलं आहे.
स्माईल प्लिज, हॅशटॅग प्रेम, यारी दोस्ती या चित्रपटांमध्ये मितालीनं काम केलं आहे. तर असंभव, भाग्यलक्ष्मी, फ्रेशर्स या मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली. मितालीनं काही दिवसांपूर्वी तिच्या फॉरेन ट्रीप्सचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. मितालीच्या सोशल मीडियावरील फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. तिला इन्स्टाग्रामवर 726K फॉलोवर्स आहेत.
मितालीनं 2021 मध्ये अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत (Siddharth Chandekar) लग्नगाठ बांधली. सिद्धार्थ आणि मिताली हे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)