Telly Masala : 'खुर्ची'चा जबरदस्त टीझर रिलीज ते फुलवा खामकरच्या पोस्टनं वेधलं लक्ष; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Upendra Limaye: 'अॅनिमल' मध्ये काही मिनिटांचा सीन, तरीही भाव खाऊन गेला; अशी मिळाली उपेंद्र लिमयेला चित्रपटाची ऑफर
Upendra Limaye: दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाच्या (Sandeep Reddy Vanga) अॅनिमल (Animal) या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ देखील घातला आहे. या चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाचं देखील अनेकजण कौतुक करत आहेत. अशातच या चित्रपटात काम केलेल्या उपेंद्र लिमये (Upendra Limaye) या मराठमोळ्या अभिनेत्याची देखील चर्चा होत आहे. चित्रपटामधील उपेंद्र लिमयेच्या एन्ट्रीला टाळ्यांचा कडकडाट होत आहे, तसेच उपेंद्रच्या एन्ट्रीवर प्रेक्षक शिट्ट्या देखील वाजवत आहेत. अॅनिमल या चित्रपटात उपेंद्रची भूमिका काही मिनिटांची आहे. पण त्या काही मिनिटांमध्ये उपेंद्र प्रेक्षकांची मनं जिंकतो. अॅनिमल या चित्रपटाची ऑफर कशी मिळाली? याबाबत उपेंद्रनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Khurchi Teaser Out: आता सुरु झालंय 'खुर्ची'चं महायुद्ध; राकेश बापट आणि अक्षय वाघमारेच्या चित्रपटाचा जबरदस्त टीझर रिलीज
Khurchi Teaser Out: जानेवारी महिन्यामध्ये अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांच्या नव्या वर्षाची सुरुवात मनोरंजनाने होणार आहे. खुर्ची (Khurchi) हा मराठी चित्रपट देखील जानेवारी महिन्यामध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेता राकेश बापट (Raqesh Bapat) आणि अभिनेता अक्षय वाघमारे (Akshay Waghmare) हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Prasad Khandekar: हास्यजत्रेतील प्रसाद खांडेकरचा मुद्दा विधानपरिषदेमध्ये गाजला, फडणवीस म्हणाले, गरज पडल्यास कायदेशीर कारवाई करु
Prasad Khandekar: आज हिवाळी अधिवेशनामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. अशातच प्रसिद्ध अभिनेता प्रसाद खांडेकरच्या (Prasad Khandekar) एकदा येऊन तर बघा (Ekda Yeun Tar Bagha) या चित्रपटाचा मुद्दा देखील विधानपरिषदेमध्ये मांडण्यात आला. यावेळी प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी विधानसभेत सांगितलं की, "एकदा येऊन तर बघा या चित्रपटाला थिएटरमध्ये शो मिळत नाहीयेत." दरेकरांचा हा मुद्दा ऐकल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, 'गरज पडल्यास कायदेशीर कारवाई करु'.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Phulwa Khamkar: "मला आठवणारे बाबा दारूच्या आहारी गेले होते, इतक्या गोड माणसाला ती दारू संपवीत होती"; फुलवा खामकरच्या पोस्टनं वेधलं लक्ष
Phulwa Khamkar: प्रसिद्ध कोरिओग्राफर फुलवा खामकर (Phulwa Khamkar) ही तिच्या नृत्यशैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकते. फुलवा ही प्रसिद्ध लेखक अनिल बर्वे यांची मुलगी आहे. फुलवाचे वडिल अनिल बर्वे यांचे निधन होऊन काल 39 वर्ष झाली. फुलवानं तिच्या बाबांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेय तिनं या फोटोला दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Chhawa Movie: विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार महत्वाची भूमिका; पोस्ट शेअर करत दिली माहिती
Chhawa Movie: विकी कौशलचा छावा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.छावा या चित्रपटात विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे.एका मराठमोळ्या अभिनेत्यानं छावा या चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा