एक्स्प्लोर
‘एक अलबेला’ सिनेमाचा टीझर लाँच, विद्या बालनची मराठीत एंट्री
मुंबई: बॉलिवूडमध्ये आपल्या स्वत:च्या स्वतंत्र नृत्यशैलीचा ठसा उमटविलेले दिवंगत अभिनेते भगवानदादा यांच्या जीवनावरील ‘एक अलबेला’ या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता मंगेश देसाई या चित्रपटात भगवानदादांची भूमिका साकारतो आहे. तर गीता बालींच्या भूमिकेत विद्या बालन दिसणार आहे.
मराठीत पहिल्यांदाच विद्या बालन दिसणार आहे. त्यामुळे या चित्रपटाबदद्लची प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. या चित्रपटातील विद्या बालनचा लूक गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय आहे.
हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून हा चित्रपट हिंदी सिनेसॄष्टीतील पहिले डान्सिंग स्टार म्हणून लोकप्रिय असलेले भगवान दादा यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शेखर सरतांडेल यांनी केले आहे.
व्हिडिओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement